आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran's Senior Commander Suleimani Killed In US Airstrikes; Avenge: Supreme Leader Ayatollah Khomeini Warns US

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे ज्येष्ठ कमांडर सुलेमानी ठार; बदला घेऊ : सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचा अमेरिकेला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर डागली क्षेपणास्त्रे
  • अमेरिकींना तत्काळ इराक सोडण्याची सूचना
  • अस्थिरतेमुळे इंधन तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या

​​​​​​​बगदाद/वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराण लष्करातील बाहुबली म्हणून ओळख असलेले जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड््स कॉर्प्सचा भाग असलेली कुद्स फोर्सचे ते प्रमुख होते. ही शाखा थेट खोमेनी यांच्या देखरेखीखाली कार्यरत आहे.

शुकव्रारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर इराण-अमेरिकेदरम्यान तणाव वाढला असून इराणने या हल्ल्याचा बदला घेऊ, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. हा इशारा पाहता अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना तत्काळ इराक सोडून परतण्याची सूचना केली आहे. यासोबतच मध्य-पूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता पाहून जागतिक पातळीवर इंधन तेलाच्या किमती चार टक्के वाढल्या.

पेंटागॉनने याबाबत माहिती देताना सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशांनुसार हा हल्ला करण्यात आला. त्यात सुलेमानी मारले गेले. अमेरिकेने सुलेमानी यांना दहशतवादी घोषित केले होते. इराकमधील अमेरिकी ठिकाणांवर होणारे हल्ले सुलेमानी यांच्याच इशाऱ्यावर केले जात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. सुलेमानी मारले गेल्यावर ट्रम्प यांनी ट्विटरवर केवळ अमेरिकी झेंडा पोस्ट केला.

हसद अल शाबी लक्ष्य

अमेरिकी क्षेपणास्त्रांनी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हसद अल शाबीच्या काफिल्यास लक्ष्य केले. इराकधील हे निमलष्करी दल इराणच्या संपर्कातील मुख्य गट मानला जातो. या हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह हसदचे उपप्रमुख अबू महदी अल-महांदिससह पाच जण मारले गेले. दरम्यान, सुलेमानी यांच्या मृत्यूबद्दल इराणमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. संबंधित. देश-विदेश पानावर

तणावामुळे जगभरात चिंता, स्थिती आणखी न भडकणेच चांगले : भारत

नवी दिल्ली : सुलेमानी यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने जगभर यामुळे चिंतेचे वातावरण असल्याचे म्हटले आहे. या भागात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, स्थिती आणखी न भडकणे कधीही हिताचे आहे. भारताने यापूर्वीच्या काळात नेहमीच संयमाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले.

परिणाम भोगण्यास तयार राहा 

अमेरिकेची ही कारवाई म्हणजे एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. याचे परिणाम भोगण्यासाठी अमेरिकेने तयार राहावे -जवाद जरीफ, इराणचे परराष्ट्रमंत्री.

इराणचा इशारा


सुलेमानी यांचा मृत्यू ही मध्य-पूर्वेतील सर्वात मोठी घटना आहे. यानंतरच्या काळात इराण आणि मध्य पूर्वेतील त्याच्या समर्थक शक्ती इस्रायलसह अमेरिकेविरुद्ध कारवाया करतील, असे मानले जात आहे. दरम्यान, इराणच्या प्रत्युत्तरादाखल संभाव्य कारवाईची शक्यता पाहता इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यान्याहू ग्रीसचा दौरा अर्धवट सोडून परतले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...