आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरोधी आंदोलनात हिंसाचाराचा भडका, 65 जणांचा मृत्यू किमान 2500 लोक जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद - इराकमध्ये आर्थिक सुधारणा आणि भ्रष्टाचारविरोधी मागण्यांसाठी सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. याच आंदोलनात हिंसाचार भडकला आणि किमान 65 जणांचा मृत्यू झाला. सोबतच, राजधानी बगदादसह, नसिरिया, दिवानिया आणि बसरा येथे मंगळवारपासून निदर्शने सुरू आहेत. या संपूर्ण आंदोलनांमध्ये 2500 हून अधिक लोक जखमी झाल्याची आकडेवारी शनिवारी समोर आली आहे. इराकच्या आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला.

देशात भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या दरम्यान ठीक-ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. सर्वप्रथम सरकारविरोधी घोषणा देणाऱ्यांनी लेफ्टनंट जनरल अब्दुल वहाब अल सदी यांचे फोटो दाखवले. त्यांनी आयसिसविरोधी कारवायांमध्ये दाखवलेल्या पराक्रमाचे ते फोटो होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पाण्याचा मारा देखील करण्यात आला. यावरूनच आंदोलक भडकले आणि पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत असंख्य लोक जखमी झाले.