आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराक प्रश्न आणि अमेरिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 2003 मध्ये इराककडे अण्वस्त्रे आहेत आणि ती जगाला धोकादायक आहेत असा जावई शोध लावून इराकवर आक्रमण केले. तसेच ते इराकीय तेल पद्धतशीरपणे अमेरिकेच्या तेल कंपन्यांना मिळवून दिले. सध्या सुन्नी गटाने अनेक लढाऊ तरुणंना सोबत घेऊन इराकच्या मुख्य शहरांवर हल्ले करुन त्यावर ताबा मिळवला आहे. इराकचे पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांनी अमेरिकेला मदतीचे आवाहन करुनही त्यावर अमेरिका ठोस पाऊल उचलत नाही याला कारण अमेरिकेला आता इराक मधील तेलाबाबत रस कमी होत आहे.अमेरिकेने इराकला धोकादायक देश घोषित केल्यानंतर त्या देशातील लोकांना गेल्या दहा वर्षांपासून दहशत व हालाखीचे जीवन जगत आहेत. दहशतवाद्यांच्या बंडाला काही ठिकाणी नागरिकांचा पाठिंबा मिळतो आहे त्यामागे हेच कारण आहे. आजच्या इराकच्या स्फोटक अवस्थेला अमेरिकादेखील तितकाच जबाबदार आहे. अमेरिकेच्या स्वार्थी खेळीमुळे भारतासारख्या विकसनशील देशांचे मोठे नुकसान होत आहे.