नवरात्री: आता ट्रेनमध्ये / नवरात्री: आता ट्रेनमध्ये मिळत आहेत उपवासाचे पदार्थ, IRCTC ने सुरु केली नवीन सुविधा

दिव्य मराठी वेब टीम

Oct 11,2018 04:53:00 PM IST

ट्रॅव्हल डेस्क: सध्या नवरात्री सुरु आहे. अशा वेळी अनेक लोकांना नवरात्रीच्या काळात उपवास असतो, त्यांना ट्रेनने प्रवास करावा लागतो. अशा लोकांसाठी रेल्वेने बुधवारपासून नवीन सुविधा सुरु केली आहे. आता प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये उपवासाचे पदार्थ ऑर्डर केले जाऊ शकतील. आईआरसीटीसीने सांगितले की, सणांच्या काळात जास्तीत जास्त लोक उपवास करतात. यामुळे 10 ऑक्टोबरपासून मेन्यूमध्ये उपवासाचे पदार्थ समाविष्ट केले जातील. ई-केटरिंग ऑप्शनने बुकिंग केली जाऊ शकते.

काय काय मिळेल
या सात्विक भोजनामध्ये साबुदाना, सेंधे मीठ, 'कुट्टूका आटा' आणि काही भाज्यांचा समावेश आहे. सध्या हे पदार्थ नागपूर, अंबाला, जयपूर, इटारसी, झांसी, नाशिक, रतलाम, मथुरा, निजामुद्दीन आणि लखनऊ स्टेशनवर मिळत आहे.

कॅश ऑन डिलेवरीची सुविधा
ई-केटरिंग वेबसाइट www.ecatering.irctc.co.in किंवा फूड ऑन ट्रॅक एपवरुन नवरात्र थाली, साबुदाना खिचडी, लस्सी, फ्रूट चाट ऑर्डर केली जाऊ शकते. परंतु यासाठी प्रवास सुरु होण्याच्या दोन तासांपुर्वी ऑर्डर द्यावी लागेल. प्रवाशांना कॅश ऑन डिलेवरीची सुविधाही देण्यात येईल.

X
COMMENT