Home | Business | Business Special | IRCTC offering Dubai Tour Packages 2019

नवीन वर्षात दुबईला जाणे झाले स्वस्त, IRCTC देत आहे पाच दिवसांचा टूर पॅकेज...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 05:16 PM IST

आता करा बुकिंग, जानेवारीत करा एंजॉय.

 • IRCTC offering Dubai Tour Packages 2019

  नवी दिल्ली - परदेशात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर खर्चाची चिंता न करता दुबई ट्रिप प्लॅन करू शकता. तुमचे विदेश फिरण्याचे स्वप्न IRCTC पूर्ण करणार आहे. यासाठी IRCTC तुम्हाला दुबई टूर पॅकेज देत आहे. 5 दिवस आणि 4 रात्रींच्या या Dazzling Dubai इंटरनॅशनल टूर पॅकजमध्ये खूप काही आहे. या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईतून होईल.

  या सुविधा आहेत टूर पॅकेजमध्ये
  - या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अॅरेबियाची प्लाइट मुबंई ते दुबई आणि दुबई ते मुंबईची यात्रा, एअरपोर्ट ट्रांसफर, होटलचा स्टे में, साइटसीइंग, नॉर्मल दुबई वीजा फीज, 5 दिवसाचे 5 ब्रेकफस्ट आणि डिनर, एसी बसमधून फिरणे, ट्रॅव्हल इंश्योरेंस आणि सगळ्या प्रकारचे टॅक्सही सामील आहेत.

  इतका येईल खर्च

  - 21 सप्टेंबर 2018 पासून झालेल्या या टूर पॅकेजमध्ये डबल आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीवर प्रति व्यक्ती 48 हजार 990 रुपये खर्च आहे तर सिंगल ऑक्यूपेंसीवर प्रति व्यक्ती 59 हजार 990 रुपये खर्च आहे.


  जानेवारीपासून सुरू होईल ही यात्रा

  - या टूर पॅकेजमध्ये जानेवारी, फेब्रूअरी आणि मार्च या तीन महिन्याच्या डेट्स मिळतील. 19 जानेवारी 2019 साठी डबल आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीवर या टूर पॅकेजची किंमत 50 हजार रुपए आहे तर सिंगल ऑक्यूपेंसीवर याची किंमत 62 हजार 690 रुपये आहे.

  - 14 फेब्रुवारी 2019 साठी डबल आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीवर पॅकेजची किंमत 48 हजार 190 आणि सिंगल ऑक्यूपेंसीवर 59 हजार तर 30 मार्चपासून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजवर डबल आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीची किंमत 47 हजार 590 रुपए आणि सिंगल ऑक्यूपेंसीवर 58 हजार 590 रुपए आहे.


  या टूर पॅकेजमध्ये अबूधाबीची ट्रिपही सामील आहे

  - 5 दिवस आणि 4 रात्रीच्या या टूर पॅकेजमध्ये दुबईच्या लोकप्रिय जागा जसे- दुबई मॉल, बुर्ज खलीफा, मिरेकल गार्डन, क्रूज, दुबई म्यूजिम आणि डेजर्ट सफारी एंजॉय करता येईल. त्यासोबतच अबू धाबीमध्ये शेख जायद मस्जिद, फेरारी वर्ल्ड, मॉल ऑफ एमिरेट्स, सगळ्यात मोठे थीम पार्क्स आणि स्नो पार्क सारख्या जागाही फिरवल्या जातील.

  डेझर्ट सफारी आणि क्रूज डिनर

  - दुबईमध्ये डेजर्ट सफारी रोज होते. सफारीमध्ये वाळूत गाडी चालवण्यापासून ते फूड आणि लोकल डांस पण आहेत. डेजर्ट सफारी रेन्ज रोवर, हमर सारख्या गाड्यांमधून केली जाते. टूरिस्ट्सना दुबईमध्ये क्रूज, जुमेराह बीच फिरवले जाते.

Trending