Home | Gossip | irfan khan can play daku dadua's roll in tigmanshu dhulia's film

डाकूच्या चकमकीवर आधारित चित्रपटात इरफान बनणार ददुआ, आणखी एक दरोडेखोर झळकणार पडद्यावर 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 05:35 PM IST

चित्रपटाचे काम झाले आहे सुरू... 

 • irfan khan can play daku dadua's roll in tigmanshu dhulia's film

  एंटरटेन्मेंट डेस्क : डाकू आणि बंडखोर बॉलीवूडच्या निर्मात्यांचे आवडते विषय राहिले आहेत. आतापर्यंत यावर 'शोले', 'बँडिट क्वीन' आणि 'पान सिंह तोमर' सारखे चित्रपट आले आहेत. नुकतेच चंबलच्या दरोडेखोरावंर 'सोन चिड़िया' आला होता. 'पान सिंह तोमर' बनवणारे तिग्मांशु धुलिया आता ८०च्या दशकात बुंदेलखंडच्या ललितपुर, बांदा, चित्रकूट, जालौन आणि हमीरपुरसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील अनेक भागात कुख्यात डकैत शिवकुमार पटेल ऊर्फ ददुआ डाकूवर चित्रपट बनवणार आहेत. सूत्राच्या माहितीनुसार... तिग्मांशुचा जिगरी मित्र इरफान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसू शकतो. चित्रपटाशी जोडलेल्या लोकांच्या मते यामध्ये, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांच्या राजकीयी करणाची स्पर्धा दाखवली जाईल.

  दरोडेखोर पुन्हा पडद्यावर : तिग्मांशु धुलिया करणार निर्मिती
  कोण होता ददुआ :

  बुंदेलखंडच्या अनेक भागात ददुआची चलती होती. त्याच्या इशाऱ्यावर राजकारण चालत होते. तो ज्याला म्हणेल लोक त्याच उमेदवालारा मत टाकत होती. ददुआला बीएसपीने आपल्या गोट्यात सहभागी करून घेतले होते. त्यावेळी त्याने फरमान सोडले..., 'मोहर लगाना हाथी पर, वरना गोली चलेगी छाती पर'. यानंतर तो सपाच्या गोट्यात आला. जुलै 2007 मध्ये त्याला एसटीएफने चकमकीत ठार मारले. त्याने 20-25 साथीदारांसोबत दोन तास पोलिसांवर फायरिंग केली. ददुआ 'दादावाची उंची वीरप्पनपेक्षाही मोठी होती. त्याचे चित्रकूट परिसरात राजकीय साम्राज्य होते. त्याचा मुलगा आमदार आणि भाऊ खासदार राहिले आहेत. चित्रपटांची कथा मूलतः ददुआच्या राजकीय वापरावर आणि यूपी एसटीएफच्या चकमकीवर आधारित असेल.

  आणखी एका चित्रपटाची योजना
  याशिवाय इरफानला घेऊन तिग्मांशु आणखी एक चित्रपट तयार करणार आहेत. ते म्हणाले, 'मी आणि इरफानला घेऊन आणखी एक चित्रपट बनवणार आहे. मात्र तो या लोकसभा निवडणुकीच्या परिणामावर आधारित असेल. कोणाची सरकार येईल यावर चित्रपटाची कथा तयार करयात येईल.

  इरफान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसू शकताे. ददुवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी तिग्मांशु यांनी काहीच सांगितले नाही, परंतु या प्रकल्पातील त्याच्या जवळच्या मित्रांनी इरफानच या भूमिकेत दिसेल असे सांगितले. तो उपचार करून परत आला आहे. सध्या तो उदयपूरमध्ये 'इंग्लिशमीडियम'चे शूटिंग करत आहेत

Trending