आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Irfan Khan, Who Is Sitting In A Wheelchair, Hides His Face After Watching The Media

व्हीलचेअरवर बसलेल्या इरफानने मीडियाला पाहून लपवला चेहरा, फॅन्सने फोटो काढणाऱ्यांना सुनावले खडे बोल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बऱ्याच दिवसांपासून लंडनला गेलेला इरफान खान शुक्रवारी रात्री भारतात परतला आहे. त्याला मुंबई एअरपोर्टवर सोबत केले गेले. यादरम्यान तो व्हीलचेअरवर होता आणि तिथे असलेल्या मीडियाच्या फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्सपासून लपण्यासाठी आपला चेहरा झाकत होता.  त्याने डार्क ब्लू डेनिम, ब्लॅक जॅकेट, व्हाइट शर्ट, ब्लू कॅप आणि व्हाइट शूज घातलेले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता लंडनला... 
इरफान सध्या डायरेक्टर होमी अदजानियाचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' वर काम करत आहे. जो 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'हिंदी मीडियम' चा सीक्वल आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो लंडनला गेला होता. सांगितले जात आहे कि, लंडनचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर तो मुंबईला परतला आहे.  फॅन्सने व्यक्त केली चिंता... 
इरफानला व्हीलचेअरवर पाहून त्याच्या फॅन्सने चिंता आणि फोटो काढणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे, "अइयो पापा...ते व्हील चेअरवर का आहेत ? देव त्यांच्यावर आशीर्वादाचा हात सदैव ठेवो आणि लवकरात लवकर त्यांना बरे करो." आणखी एका यूजरची कमेंट आहे, "असे फोटो काढल्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे." एका यूजरने लिहिले, "माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीला एकटे सोडा."

मार्च 2018 मध्ये इरफान खान न्यूरो इंडोक्राइन ट्यूमरचा उपचार करून घेण्यासाठी लंडनला गेला होता. तेथे तो सुमारे एक वर्ष राहिला आणि ठीक झाल्यानंतर 2019 मध्ये भारतात परतला. परतल्यानंतर त्याने त्याचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चे शूटिंग राजस्थानमध्ये केले आणि मग पुढच्या शेड्यूलसाठी तो लंडनला गेला. चित्रपटात करिना कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...