आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Irfan Pathan Replied To Abdul Razzaq, Saying, 'Do You Remember How The Sticks Were Blown ...'

इरफान पठाणने दिले अब्दुल रज्जाकला उत्तर, म्हणाला- 'लक्षात आहे का, कशा दांड्या उडवल्या होत्या...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अब्दुल रज्जाकने एका इंटरव्ह्यूमध्ये बुमराहला बेबी बॉलर म्हटले होते

स्पोर्ट डेस्क- पाकिस्तानी ऑलराउंडर अब्दुल रज्जाकने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला बेबी बॉलर म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावर इरफान पठाणने त्याला सडेतोर उत्तर दिले आहे.

इरफानने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदादच्या जुन्या एका विधानाचा संदर्भ दिला. मागे एकदा जावेद मियांदादने म्हटले होते की, इरफानसारखे गोलंदाज आमच्या इकडे गल्लीत खेळतात. त्यावर इरफानने उत्तर दिले की, जेव्हा-जेव्हा हा गली बॉलर, यांच्यासमोर आला, तेव्हा यांची दांडी गुल झाली. अब्दुल रज्जाक म्हणाला की, त्याला जसप्रीत बुमराहचा सामना करायला काहीच अडचण नाहीये. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये रज्जाक म्हणाला होता की, जसप्रीत बुमराहचा सामना करायला काहीच अडचण नाही. मी मॅक्ग्राथ, वसीम अकरम आणि शोएब अख्तरसारख्या महान गोलंदाजांचा सामना केला आहे. जसप्रीततर बेबी बॉलर आहे.

जावेद मियांदादच्या वक्तव्यानंतर कराची टेस्टमध्ये पठाणने हॅट्रिक घेतली होती
 
2005-2006 मध्ये जेव्हा भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता. तेव्हा जावेद मियांदादच्या वक्तव्यानंतर पठाणने कराची टेस्टमध्ये हॅट्रिक घेतली होती. सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये सलमान बट्‌ट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफला आउट केले होते.

जसप्रीत बुमराह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर एक
 
बुमराह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याचे 797 पॉइंट्स आहेत. दुखापतग्रस्त असल्यामुळे सध्या तो संघात खेळत नाहीये. 

बातम्या आणखी आहेत...