Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Tomato removes iron deficiency, special health benefits

लोहाची कमतरता दूर करतो टोमॅटो, होतात खास आरोग्य लाभ  

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 16, 2019, 12:05 AM IST

जाणून घ्या, टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी

 • Tomato removes iron deficiency, special health benefits

  टोमॅटो फक्त भाजीच नाही, तर पौष्टिक आिण गुणकारी फळदेखील अाहे. शरीरातील लोहतत्त्वाला दूर करण्यासही मदत करतो. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि कित्येक प्रकारच्या पौष्टिक तत्त्वांचे भरपूर प्रमाण यात आहे. जाणून घ्या, टोमॅटो खाल्ल्यामुळे शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी.


  - दररोज २०० ग्रॅम टोमॅटोचा रस प्यायल्यास अॅनिमियामध्ये खूप फायदा होतो.
  - वजन कमी असणाऱ्यांनी जेवणाच्या वेळी शिजवलेले टाेमॅटो खाल्ल्यास त्यांचे वजन वाढते.


  - टोमॅटो खाल्ल्यामुळे तोंडात येणारे फोडच बरे होत नाहीत, तर बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
  - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए असते जे दृष्टी सुधारण्यास मदत करते.


  - उन्हाळ्यात सारखी तहान लागत असेल तर २०० ग्रॅम टोमॅटोच्या रसात दोन तीन लवंगाचे चूर्ण मिसळून प्यायल्यास लाभ होतो.
  - टाेमॅटोचा रस सकाळ- संध्याकाळ प्यायल्यास दातांतून रक्त येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.


  - भूक लागत नसेल तर २०० ग्रॅम टोमॅटोच्या रसात अद्रकाचा आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास लवकर फायदा होतो.
  - टोमॅटोच्या रसात नारळाचे तेल मिसळून मालिश केल्यास खाजेची समस्या लवकर बरी होते. यामुळे त्वचेची चमक दीर्घकाळ राहाते.

Trending