Hollywood / अॅव्हेंजर्स एंडगेममधील आयर्न मॅनला मिळाली इतकी फी, ही रक्कम दोन बाहुबली चित्रपटांच्या बजटपेक्षाही जास्त

54 वर्षीय रॉबर्ट डाउनी जुनिअर प्रत्येक चित्रपटासाठी सरासरी आकारतात 139 कोटी रूपये फी
 

दिव्य मराठी

May 02,2019 09:44:00 AM IST


हॉलीवुड डेस्क - अॅव्हेंजर्स एंडगेम बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. सध्या चित्रपटाचे ग्लोबल कलेक्शन 10 हजार कोंटीवर पोहोचले आहे. तर भारतात या चित्रपटाने फक्त पाच दिवसांत 200 कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवार पर्यंत 217.50 कोटींचा गल्ला जमवला. भारतात तेजीने 200 कोटींचा आकडा पार करणारी अॅव्हेंजर्स एंडगेम पहिला चित्रपट ठरला आहे.

अॅव्हेंजर्स एंडगेमचे कलाकार भारतीय चित्रपटांवर वरचढ ठरत आहेत. या चित्रपटातील महत्वाची भूमिका साकारणारे आयर्न मॅन म्हणजेच रॉबर्ट डाउनी जुनिअर यांनी घेतलेली फी 'बाहुबली: द कन्क्लूजन'च्या बजटपेक्षा दुप्पट आहे. रॉबर्ट डाउनी जुनिअर यांच्या फी मध्ये दोन बाहुबली चित्रपटांची निर्मिती झाली असती. बाहुबलीची भूमिका निभावणारा प्रभासला 25 कोटी रूपये फी मिळाली होती. तर आयर्न मॅन साकारणाऱ्या रॉबर्टला मार्व्हल स्टुडिओच्या या 22 व्या चित्रपटासाठी 524 कोटी रूपये मिळाले आहे.


अॅव्हेंजर्स एंडगेम भारतीय बॉक्स ऑफिसचे 2019 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. भारतीय बॉक्स ऑफिसच्या कमाई बाबतीत जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला 'उरी : द सर्जिकर स्ट्राइक 245 कोटी रूपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे'

X