आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचा बेजबाबदारपणा, व्हाइट हाउसमधून निनावी पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दन्यू यॉर्क टाइम्ससाठी हा लेख व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी लिहिला आहे. ट्रम्प प्रशासनातील सर्व बाबी माहिती असलेले तसेच सर्व योजना, निर्णय व आदेशांच्या अंमलबजावणीतही ते सहभागी असतात. या अधिकाऱ्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर हा लेख लिहिला आहे. अमेरिकेतील माध्यमे किंवा बाहेरील अन्य कोणत्याही व्यक्तीला माहिती नाहीत, अशा बाबी या अधिकाऱ्यांनी यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


मी आणि माझ्यासारखी विचारसरणी असलेल्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शपथ घेतली आहे की, आम्ही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अजेंडे आणि त्यांचे उद्दाम मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे त्यांच्या कार्यकाळातील अशा कसोटीतून जात आहेत, ज्याचा सामना यापूर्वीच्या अध्यक्षांना कधीही करावा लागला नाही. ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे त्यांचा पक्ष संसदेत कमकुवत ठरत आहे, असे नव्हे, तर देशच विभागला जात आहे. अमेरिकेची प्रतिष्ठा लयास जात आहे. 


खरी समस्या अशी आहे की, अध्यक्षांना ज्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, त्यांची जाण ट्रम्प यांना नाही. त्यामुळे त्यांच्या प्रशासनात काम करणारे व्हाइट हाऊसचे अनेक अधिकारी किती मेहनत व निष्ठेने काम करतात, हे यावरूनच कळते. राष्ट्राध्यक्षांचा अजेंडा आणि त्यांचा हट्टीपणा सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा ते निराश होतात. मीदेखील त्यांच्यापैकीच एक आहे. पण आमचा कोणत्याही प्रकारे अडथळा नाही, हे इथे मी स्पष्ट करतो. प्रशासनाने उत्कृष्ट काम करावे आणि यशस्वी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या धोरणांमुळेच आज अमेरिका सुरक्षित आणि जास्त समृद्ध आहे, हेही आम्ही मान्य करतो. पण देशहितासाठी काम करणे, हे आमचे पहिले कर्तव्य असताना राष्ट्राध्यक्ष मात्र देशाच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेली कामे करत आहेत. ट्रम्प प्रशासनात जेवढ्या नियुक्त्या झाल्या आहेत, ते सर्व अधिकारी लोकशाही संस्था आणि देशहिताला प्राधान्य देतात, पण त्यांना अनेकदा राष्ट्राध्यक्षांच्या चुकीच्या निर्णयांशी संघर्ष करावा लागतो. 


अनेक समस्यांचे मूळ हे राष्ट्राध्यक्षांच्या अनैतिकतेत आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला हे उत्तमरीत्या माहिती असते की, ते कोणत्याही प्रकारचे तत्त्व मानत नाहीत. एखादा निर्णय घेतानाही ते तत्त्वांची मदत घेत नाहीत. रिपब्लिकन पक्षाचे असूनही ते 'फ्री माइंड, फ्री मार्केट आणि फ्री पीपल' या तत्त्वाचा फार कमी वापर करतात. त्याऐवजी ते असे विचार पूर्णपणे अमान्य करतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी माध्यमे, व्यापार, लोकशाही इत्यादींना फार महत्त्व नाही. माध्यमे ही नागरिकांचे शत्रू असतात, असा त्यांचा समज आहे. व्यापार धोरण व लोकशाहीविरोधी विचारांनी त्यांचे धोरण ठरते. असे असूनही त्यांच्या प्रशासनाला जे यश मिळाले आहे, त्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला श्रेय देणे चुकीचे आहे. कारण ते अत्यंत प्रतिकूल, तुच्छ आणि निष्प्रभ आहे. 


अविचाराने निर्णय: व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नुकतेच मला सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेत कोणत्याही क्षणी विषय बदलतो. अनेकदा ओव्हल ऑफिसमध्ये होणाऱ्या बैठकीत अधिकाऱ्यांना निराशाही येते. पण त्यांना राष्ट्राध्यक्षांचे म्हणणे ऐकावेच लागते. मोठ्या आणि गंभीर मुद्द्यांवर ट्रम्प निर्णय घेण्याची घाई करतात. धोरणात्मक मुद्दा असेल तेव्हा तर एका आठवड्यातच निर्णय होतो. 


माध्यमांसाठी खलनायक : राष्ट्राध्यक्षांच्या काही सहकाऱ्यांना माध्यमांनी खलनायक घोषित केले आहे. कारण ते अंतर्गत बाबी बाहेर येऊ देत नाहीत. चुकीचे निर्णय रोखण्याची क्षमता असलेले हे सहकारी आहेत. पण ते नेहमीच असे करत नाहीत. अमेरिकेतील नागरिकांना याची जाणीव हवी की, व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्यांना इथे काय सुरू आहे, याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचे काहीही मत असले तरी जे योग्य आहे, तेच आम्ही करतो. 


परराष्ट्र धोरण : सार्वजनिक व खासगीमध्येही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हुकूमशाहांप्रती प्राधान्य दर्शवतात. उदा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन. मित्र राष्ट्रांशी संबंध मजबूत करण्याचे ते फार कमी प्रयत्न करतात. काही जणांना हेही माहिती असेल की, ट्रम्प यांच्या आजूबाजूला असणारे अधिकारी वेगळे असतात व उर्वरित प्रशासकीय अधिकारी देशाच्या हितासाठीच काम करत असतात. त्यांनीच राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप उघडकीस आणला.रशियाला त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. 


... तर ट्रम्प यांना हटवले असते : अमेरिकेतील राजकारणात अस्थैर्याचे वातावरणही निर्माण झाले होते. एकदा तर कॅबिनेटने २५ व्या घटनादुरुस्तीची तयारीही सुरू केली होती. याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना हटवले जाण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. पण कुणालाही घटनात्मक संकट नको होते. त्यानंतर आम्ही सर्वांनीच मिळून ठरवले की, देशहितासाठी आणि प्रशासनासाठी योग्य असेल तेच करूया. 
© The New York Times 

बातम्या आणखी आहेत...