आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना समर्पित आहे 'अंग्रेजी मीडियम'चे 'कुड़ी नू नचने दे...' गाणे, प्रमोट करायला एकत्र आल्या आघाडीच्या आठ अभिनेत्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्रींनी शेअर केला टीझर
  • इरफान प्रमोशन करू शकत नसल्यामुळे अभिनेत्रींनीच दिली साथ

बॉलिवूड डेस्कः इरफान खानचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. इरफान आजारपण आणि उपचारामुळे या चित्रपटाचे प्रमोशन करू शकत नाही. त्यामुळे त्याचा सन्मान करणाऱ्या बॉलिवूडमधील आठ अभिनेत्रींनी पुढाकार घेतला आहे. या सर्व चित्रपटातील एक गाणे 'कुड़ी नु नचे दे' मध्ये दिसतील. वुमन एम्पाॅवरमेंटला समर्पित या गाण्याच्या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ, आलिया भट, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, िकआरा आडवाणी, कृती सेनन आणि णि स्वत: चित्रपटातील अभिनेत्री राधिका मदान दिसणार आहे. बऱ्याच दिवसांनंतर एका गाण्यात एवढ्या अभिनेत्री दिसतील. या सर्व अभिनेत्रींना एक़त्र आणण्याची कल्पना निर्माता होमी अदजानिया यांची होती. यासाठी त्यांनीच सर्वांशी संपर्क साधला होता. या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिले असून विशाल ददलानी याने गायले आहे. 

याबाबत चित्रपट निर्माता दिनेश विजन म्हणतो, 'बाॅलिवूड फक्त इंडस्ट्री नाही, याप्रकारच्या सहकार्यामुळे चांगले संबंध निर्माण होतात. मला अशी अपेक्षा आहे की, हे आम्हाला आणि आमच्यसारख्यांसाठी खूप मोठे समर्थन आणि प्रोत्साहन आहे.'

अनुभवांबाबत सांगताना अभिनेत्रींनी व्यक्त केल्या त्यांच्या भावना

  • 'होमीने मला गाणे पाठवले होते. त्यावेळी गाण्यावर काम सुूरू होते. आताही सरुच आहे. हे गाणे सर्वांनाच सुपर हॅप्पी करणारे आहे. ' - अनुष्का शर्मा
  • 'हे गाणे मुलीचा आतील आवाज आहे. ती म्हणते- आम्हाला जीवनाचा आनंद आमच्या पद्धतीने घेऊ द्या.' - किआरा आडवाणी
  • 'हे गाणे सर्व वयातील मुलींसाठी आहे. हे निश्चितपणे माझे गाणे आहे.' - अनन्या पांडे
  • 'मला हे गाणे खूप आवडते. हे गाणे ऐकताना मला अधिक उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली, मला नृत्य करण्याची इच्छा झाली...याचे बोल खूप सार्थक आहेत. ' - आलिया भट
  • 'एका मुलीच्या पंखांना कापू नका. तिला उंच भरारी घेऊ द्या. आणि मग पाहा ती हे जगच जादूई करेल.' - राधिका मदान
  • 'इरफान आणि होमी माझे आवडते कलाकार आहेत म्हणून त्यांनी ज्यावेळी मला फोन केला तर मी नकार देऊ शकले नाही. जर आपण कुणासाठी काही करू शकतोय तर नक्कीच करावे. इंडस्ट्रीनेही असेच वागावे.' - कतरिना कैफ
  • 'इरफान सरांनी आम्हा सर्वांनाच खूप काही दिले आहे आणि ते लवकरच बरे व्हावे असे सर्वांनाच वाटते. चित्रपटात त्यांनी आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार असलेल्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ' - जान्हवी कपूर
बातम्या आणखी आहेत...