आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इर्शाद बागवान  

"अजी दादा, मइ मजाक  नै  करता तुमारा. यो टिकटॉकंच हय. टिकटॉक कतो मजाकमस्तीका व्हिडिओ. इसकू रेकॉर्ड करके मोबाईलपर दाल्ते. दोस्तलोगां देकते न् लाईक करते. जेत्ते ज्यादा लाईक मिल्ते वत्ते अपुन फेमस हुनाले. इसवास्ते हमें तिनोंने इ आयड्या करें.' 


मन्सूरभाई काठी टेकत येत होते. त्यांना येताना बघून कट्ट्यावरच्या ज्येष्ठांमध्ये चुळबूळ झाली. त्यांना बसण्यासाठी जागा मोकळी करण्यात आली. "खवट म्हातारा' म्हणून मन्सूरभाईंची ख्याती होती. "रस्सी जल गयी मगर बल नहीं गया' असं त्यांचे मित्र त्यांच्या स्वभावाचं वर्णन करायचे. मन्सूरभाई होतेही तसे. अंगकाठी बारीक पण आवाजातली धार अजूनही थरकाप उडवणारी. रोखठोक स्वभाव. 
"अरे आव आव मन्सूरभाई. सलाम अलैकूम. आव, इदर बैटो. ए कुलकर्ण्या... अरे सरक जरा पलिकडे बेट्या... जागा दे मन्सूरभाईंना', शांतीलालकाकांनी फर्मान सोडले. समोर ग्राउंडवर मुलं खेळत होती अन् इकडे कट्ट्यावर गप्पा सुरू झाल्या. राजकारण, समाजकारण आणि एकूणच ताज्या घटनांची आपआपल्या स्वभावानुसार चिरफाड सुरू झाली. 

इकडे ग्राउंडवर बाकी मुलांचा खेळ चालला होता परंतु रैन्या, रावल्या अन् आम्याचं काहीतरी निराळंच प्रकरण सुरू होतं. एका कोपऱ्यात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या सॕक ठेवल्या होत्या, त्या ठिगाऱ्यावर रावल्याने मोबाईल ठेवला. रैन्याला न् आम्याला जवळ बोलावून काहीतरी समजून सांगितलं आणि ते तिघे एकमेकांच्या गळ्यात हात टाकून कट्ट्यापर्यंत आले. तिथे आल्यानंतर पिछेमूड करत रैन्या ओरडला, "एक.. दो.. तीन...हां स्टार्ट'...आणि तिघेही मोबाईलच्या दिशेने चालू लागले. मन्सूरभाईंची गप्पांमधली तंद्री या "एक.. दो... तीन'मुळे भंग पावली अन् ते या तिकडीची करामत बघू लागले. 

तिघेही एकसाथ चालत मोबाईलच्या दिशेने गेले. मोबाईलपासून थोड्या अंतरावर एक दोनशे रुपयांची नोट ठेवून ती उडून जाऊ नये म्हणून त्यावर छोटा दगड ठेवलेला दिसत होता. तिथे पोहोचल्याबरोबर रैन्या अचानक खाली बसला. आपल्या एका हाताने ती नोट लपवण्याचा प्रयत्न करत, चेहऱ्यावर रडवेले भाव आणत, गळ्याच्या शीरा ताणून जोरात ओरडला, "भाग करण अर्जून भाग भाग... करण अर्जून भाग भाग...'. हे ऐकताच रावल्या आणि आम्या उलट कट्ट्याच्या दिशेने पळू लागले. हे काय तर्कट चालू आहे हा प्रश्न पडावा असा एकूण माहौल. मन्सूरभाई बघत होतेच. त्यांच्यासह बाकी ज्येष्ठांचीही नजर या तिकडीवर टिकली होती. रावल्या आणि आम्या धावत कट्ट्याजवळ आले तसे मन्सूरभाई उठून उभे राहिले आणि दोघांना पकडले. जोरात गरजले, "क्या रे छोरवांदान्नो, इ कोन्सा खेल निकाले नवीन ?' अचानकच्या धरपकडीने रावल्या आणि आम्या दोघेही बावचळले होते. 

तिकडून रैन्या इकडे कट्ट्याकडेच पाहात होता. मन्सूरभाईंनी त्या दोघांना धरून ठेवत रैन्याला आवाज दिला, "ए दिलावरके गाबडे, इदर आ इदर.'
रैन्याला कळून चुकले, आता सुटका नाही. तो जवळ आला. मन्सूरभाईंनी विचारले, "क्या रे ?... क्या खेल निकाल्या यो नवीन ?... ठिकठाक तो हय ना ?'
"टिकटॉक... टिकटॉक हय.' रैन्या कसाबसा उद्गारला. 
"क्या मजाक लगायलाय ?.. इदर आ इदर.' मन्सूरभाई गरजले. 
रैन्या समोर आला. म्हणाला, "तुमें ह्यां बैटो आरामशे. मइ तुम्नां समझातांव', एवढ्यात शांतीलालकाकांनी मध्यस्ती केली. "तुम्ही बसा हो इथे मन्सूरभाई. ए छोरे इदर आ. बैट.' मन्सूरभाई कट्ट्यावर बसले. 

"अजी दादा, मइ मजाक  नै  करता तुमारा. यो टिकटॉकंच हय. टिकटॉक कतो मजाकमस्तीका व्हिडिओ. इसकू रेकॉर्ड करके मोबाईलपर दाल्ते. दोस्तलोगां देकते न् लाईक करते. जेत्ते ज्यादा लाईक मिल्ते वत्ते अपुन फेमस हुनाले. इसवास्ते हमें तिनोंने इ आयड्या करें.' 

मन्सूरभाईंना एकूण प्रकरणाचा उलगडा झाला. ते म्हणाले, "अरे पन फकस्त लाईकवास्ते एत्ते लडतरां कर्ने कोंचे खुदाने बोलेलाय ?....इस्कुलां शिकते क्या योच टिवल्याबावल्या कर्ते र्हते तुमें ? ....इ मोबाईलने येडां करेलाय सबकू, बाकी कुच नहीं.'

रैन्या शरमला. थोडा विचारात पडल्यासारखा वाटला. ॲक्च्युअली माहौल सगळाच मोबाईलमय झालेला. त्यांत एकट्या रैन्याची किंवा आम्या, रावल्याची काहीच चूक नव्हती. फाल्तूगिरी आम होती... इतउप्पर फाल्तूगिरीलाच प्रतिष्ठा आली होती. 

लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२