आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीत सुरू झाले, तरीही काँग्रेस नेत्यांसोबत हास्यविनोदात रमले राहुल गांधी, व्हायरल होत आहे Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ जयपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्षाअखेरीस होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीचा शनिवारी जयपुरात शंखनाद केला. यादरम्यान रामलीला मैदानावर त्यांनी एका मोठ्या सभेला संबोधित केले. तथापि, यादरम्यान राहुल गांधींसहित इतर बड्या नेत्यांकडून मोठी चूक घडली. जेव्हा राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हाही हे नेते हास्यविनोदात रममाण झाल्याचे दिसले. हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे इंचार्ज अमित मालवीय यांनी ट्विट केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे.

 
मंचावर काय झाले?
शनिवारी राहुल गांधींच्या या कार्यक्रमात राजस्थान काँग्रेसचे सर्व मोठे नेते उपस्थित होते, यादरम्यान मंचावर एका काँग्रेस कार्यकर्त्याने सावधान म्हणून राष्ट्रगीत गाणे सुरू केले. परंतु राहुल गांधी, सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांना हे ऐकू आले नाही. आणि ते काही विषयावर हसताना दिसले. तथापि, जेव्हा त्यांना याची जाणीव झाली, ते ताबडतोब सावधान मुद्रेत उभे राहिले.

 
युजर्सनी भाजप नेत्यांच्या चुकांची आठवून करून दिली
भाजप आयटी सेलच्या इंचार्जने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत काँग्रेस अध्यक्ष आणि इतर नेत्यांवर टीका केली. पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली, अनेक युजर्स राहुल आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करत होते, तर काही युजर्सनी असे व्हिडिओही पोस्ट केले, ज्यात राष्ट्रगीताच्या वेळी भाजपच्या नेत्यांकडून चूक झाली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral होत असलेला व्हिडिओ व संबंधित आणखी Photos..  

बातम्या आणखी आहेत...