आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is Human Rights Not For Us? We Are Human Beings Too!, Dr, Disha's Father, Hyderabad Rape Case

मानवाधिकार आमच्यासाठी नाही का? आम्हीही माणसेच आहोत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. दिशाच्या वडिलांचा प्रश्न; आम्हाला भेटायला ते आले नाहीत

मंदार जोशी 

समशाबाद (हैदराबाद)- ज्यांनी माझ्या मुलीला जिवंत जाळले त्यांच्या कुटुंबाला मानवाधिकार आयोगाचे लोक भेटतात. पोलिसांवर गोळ्या चालवणाऱ्यांची भेट घेतली जाते. माझीही मुलगी गेली  आहे. आमच्यासाठी मानवाधिकार नाही का, असा प्रश्न बलात्कार करून जिवंत जाळलेल्या डॉ. दिशाचे वडील श्रीधर रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. मला न्याय कधीच मिळू शकणार नाही. आमची मुलगी गेली आहे. ती कधीच परत येऊ शकणार नाही. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे थोडा दिलासा मिळाला, अशी भावना रेड्डी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. डॉ. दिशाच्या मृत्यूला बारा दिवस पूर्ण झाले. त्यानंतर मित्रपरिवार, नातेवाईक आणि कॉलनीतील लोकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. दोन दिवसांपासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सात जणांचे पथक हैदराबादेत आहे. त्यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे मला टीव्हीवरून कळले. मात्र माझी मुलगी गेली तेव्हा या पथकातील कोणीही मला भेटले नाही. हा कुठला न्याय आहे? पोलिस सूत्रांनुसार आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही पोलिसांचे तसेच एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या चारही आरोपींच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले.  

‘ते  पोलिसांची बंदूक हिसकावू शकतात का ?’ 

तेलंगण पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता डॉ. दिशाच्या बलात्कार आणि खून प्रकरणात अटक केलेल्या मोहंमद आरिफ, जोलू शिवा, जोलू नवीन आणि चिताकुंटा चेन्नाकेकेशवुलू यांचे एन्काउंटर केले. या प्रकरणात पोलिसांच्या विरोधात १५ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. खालील प्रमुख मुद्द्यांचा याचिकेत समावेश करण्यात आला आहे.


अटक करण्यात आलेल्या चार जणांच्या विरोधात जनतेचा राग आहे. जनतेच्या या भावनांचा फायदा घेत पोलिसांनी अगदी विचारपूर्वक त्यांचे एन्काउंटर केले आहे. 


पहाटे तीन वाजता त्यांना गुन्ह्याच्या तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. यामागे पूर्वनियोजन असायला हवे. 


काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या रिपोर्टिंगनुसार ज्या वेळी या चौघांना घटनास्थळी नेण्यात आले होते तेव्हा तेथे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ५० पोलिस होते. असे असताना ते दोघे पोलिसांची बंदूक हिसकावून पळ काढतात आणि पुन्हा पोलिसांवर हल्ला करतात हे किती सयुक्तिक वाटते. 


पोलिसांनी न्याय दिला अशी चर्चा आहे. मात्र  पोलिस न्यायालयाच्या भूमिकेत कधीपासून आले? हे लोकशाहीला धरून आहे का? हे संविधानाच्या विरोधात आहे. 


अशा प्रकारे एन्काउंटर करून महिलांवरील अत्याचार थांबतील अशी भावना असेल तर ते चुकीचे आहे. शाश्वत संरक्षणासाठी एक भूमिका घेऊन काम करणे गरजेचे आहे. 


अशा प्रकारे निर्घृण खून आणि मानवतेची हत्या करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत दिलेल्या निकालांनुसार यात काम होणे आवश्यक आहे


या प्रकरणात पोलिसांवर कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदवावा, त्याचा तपास सीबीआयने करावा, पोलिसांनी याबाबत तयार केलेली कागदपत्रे, त्यांचे फोन रेकॉर्ड याची व्यवस्थित तपासणी व्हावी. 

बातम्या आणखी आहेत...