आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is #MeToo Movement Is Stopped Vikas Bahal, Sajid Khan And Many Other Back To Work

चार महिन्यांपूर्वी जन्मलेल्या 'मी टू'चा प्री मॅच्युअर मृत्यू, कामावर परतले आरोपी, नाना पाटेकर मात्र वेट अँड वॉचच्या स्थितीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या सप्टेंबर महिन्यात बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या मी टू चळवळीने संपूर्ण सिने इंडस्ट्रीला हादरून टाकले होते, आता त्या मी टूची हवा ओसरल्याचे दिसत आहे. ज्या आरोपींवर या चळवळीअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते, त्यापैकी कुणालाही मोठी शिक्षा मिळाली नाही, तथापि यापैकी काही आता कामावर परत येत आहेत. यावरच हा एक रिपोर्ट : 

 

दिग्दर्शक विकास बहल 
'सुपर-30' शी जोडलेल्या लोकांच्या मते, आरोपी विकास बहल चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामासाठी परतला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळीदेखील विकास बहलला समोर आणण्याचा विचार सुरू आहे. विकासच्या समर्थकांचा तर्क आहे की, कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामापासून दूर ठेवणे योग्य नाही.


दिग्दर्शक सुभाष कपूर 
यांच्या हातून 'मोगुल' गेला, मात्र एकता कपूरने त्यांना आपल्या वेब शोमधून काढले नाही. 'स्टेट वर्सेज नानावटी' नावाचा वेब शो समर खानसोबत सुभाष कपूरच बनवत आहे. सुभाष कपूरच्या टीममधून शशांक शहा याचे दिग्दर्शन करत आहेत. 


अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी 
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री निहारिका सिंहने नवाजवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. मात्र, नवाजच्या करिअरवर फरक पडला नाही. त्याच्या 'मोतीचूर चकनाचूर', 'ठाकरे', 'पेट्टा' आणि 'फोटोग्राफर' चित्रपटांवर परिणाम झाला नाही. 

 

गायक कैलाश खेर 
कैलाश खेरदेखील सरकारी अभियानासाठी कार्यक्रम करत आहे. नीती आयोग व इतर सरकारी मंत्रालयासाठी तो जिंगल तयार करत आहे. एक कार्यक्रम करून तो मुंबईला परतला आहे. 

 

संस्कारी बाबूजी मात्र तोट्यात 
टीव्हीचे संस्कारी बाबूजी म्हणजेच आलोक नाथ यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. त्यांना टीव्हीकडून काहीच काम मिळाले नाही. ते जास्त तणावात आहेत. 

 

वेट अँड वॉचच्या स्थितीत नाना पाटेकर 
नाना पाटेकरवर सध्या वेट अँड वॉचची परिस्थिती ओढवली आहे. त्यांनी चित्रपट साइन केले आहेत, मात्र त्यांची घोषणा झाली नाही. सूत्राच्या मते, त्यांनी गुपचूप शूटिंग सुरू केले आहे. 

 

सुभाष घई 
सुभाष घई यांच्यावर आरोप लावणाऱ्या मॉडेलने केस परत घेतली आहे. मात्र, त्यांच्यासोबत काम करण्यास काेणताही दिग्दर्शक पुढे आला नाही. पण त्यांच्या इन्स्टिट्यूटचे काम धडाक्यात सुरू आहे. 


विपुल अमृतलाल शहा 
यांच्यावर सेक्रेड गेम्सची एलनाज नरोजीने केस दाखल केली होती. मात्र, त्याच्यावर पुढे काहीच झाले नाही. आता 'नमस्ते इंग्लँड'च्या अपयशानंतर विपुल 'सिंग इज किंग'च्या सिक्वेलचा विचार करत आहे. 


साजिद खान 
यांच्यावर लागलेल्या गंभीर आरोपानंतरही अनेक निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यासाठी बैठका घेत आहेत. काही महिन्यांनंतर साजिद आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...