आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पहिले तिने गुपचुप लग्न थाटले आणि त्यानंतर अफवा पसरली की, तिने प्रेग्नेंसीमुळे घाईघाईत लग्न उरकले. आता तिचे हनीमूनचे फोटो टॉकिंग पॉईंट बनले आहेत. नेहा धुपियाने अलीकडेच पती अंगद बेदीसोबत मालदीवमध्ये हनीमून साजरा केला. तिने हनीमूनचे जे फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, त्यावरुन नेहा बेबी बंप तर लपवत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही फोटोज ती साइज पोज देताना दिसतेय, तर काहींमध्ये ती अंगदच्या मागे दिसतेय. एका फोटो तिने समोर बॅग पकडली आहे. काही फोटोत नेहा पाण्याच्या आता दिसतेय. कदाचित हा योगायोग असावा. पण नेहा मोठ्या चातुर्याने काही तरी लपवत आहे, हे नक्की.
तेव्हा भडकला होता अंगद...
काही दिवसांपूर्वी जेव्हा नेहाच्या प्रेग्नेंसीविषयी तिचा पती अंगद बेदीला विचारले गेले, तेव्हा तो भडकला होता. तो म्हणाला होता, 'जेव्हा तुम्हाला थेट संवाद साधण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला जातो, तेव्हा त्याचा गैरवापर करायला नको. जर तुम्ही असे फालतू प्रश्न विचारणार असाल, तर एक पती म्हणून मी ते सहन करणार नाही. जर तुम्ही एखाद्या विषयी चांगले बोलू शकत नसाल, तर वाईटही बोलू नका.'
नेहाच्या प्रेग्नेंसीवर वडिलांनी दिले होते हे उत्तर
जेव्हा नेहाच्या अचानक लग्नाची बातमी मीडियात आली होती, तेव्हा मीडियाने नेहाचे वडील प्रदीप धुपिया यांना प्रश्न केला होता की, नेहाने प्रेग्नेंसीमुळे घाईघाईत लग्न उरकले का? त्यावर ते म्हणाले होते, "नाही, असे काही नाही. जेव्हा कुणी घाईघाईत लग्न करतं, तेव्हा लोक त्याच्याकडे शंकेच्या नजरेने बघतात. लोक चुकीच्या अफवा पसरवतात. लग्नाचा निर्णय दोन्ही कुटुंबानी मिळून घेतला आहे. दोन्ही कुटुंबीयांकडे कामाच्या बिझी शेड्युलमुळे फारसा वेळ नव्हता. यासाठी लग्नासाठी फार कमी वेळ मिळाला."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.