Home | Maharashtra | Mumbai | Is the BJP bound to CBI for election campaign? Sachin Sawant ask the question

भाजपने सीबीआयला निवडणुकीच्या कामासाठी जुंपले का : काँग्रेसचे सचिन सावंत यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 26, 2019, 10:26 AM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दाव्यामुळे उभा राहिला नवा वाद

  • Is the BJP bound to CBI for election campaign? Sachin Sawant ask the question

    मुंबई - जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होऊ, असा सीबीआयचा अहवाल आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर भाजप आता सीबीआयला निवडणुकीच्या सर्वेक्षणाचे काम सोपवले आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी केला.


    नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सीबीआयसारख्या यंत्रणांमध्ये अवाजवी हस्तक्षेप व दबाव आणल्याचे प्रकार पाच वर्षात पहायला मिळाले. मध्यरात्रीच सीबीआयच्या मुख्यालयात दिल्ली पोलिसांचा छापा टाकून सीबीआय प्रमुखांचे कार्यालय सील करणे आणि रात्रीच नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करणे, असे प्रकार आपण मोदी सरकाराच्याच काळात पाहिले. एवढ्यावरच हे थांबले नसून आता थेट सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी निवडणूक सर्वे करण्याचे कामही सीबीआयला दिले असे मान्य केले तर ते धोकादायक आहे, असे सावंत म्हणाले.
    सीबीआयकडे अनेक महत्वाची कामं असून त्यांना अशा प्रकारच्या राजकीय सर्वेसाठी जुंपणे खेदजनक आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेला सीबीआयच्या अहवालाचा दावा खरा आहे का, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Trending