आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार म्हणजे यज्ञ आहे का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक व्यवस्थापनाबद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे सध्या फक्त स्वाहा आणि तथास्तु म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून मिळणारा नफा याकडेच अधिक लक्ष दिले जाते. आधुनिक व्यवस्थापनात या स्वाहा आणि तथास्तुचा अंदाज लावता येऊ शकतो आणि त्याला हवे तसे नियंत्रितही करता  येऊ शकते.  यज्ञ परंपरेबद्दल वेदांमध्ये व्यवस्थित समजावून सांगितले आहे. व्यापारही एक प्रकारचा यज्ञ आहे. “स्वाहा’ म्हणत यजमान यज्ञ करतेवेळी अग्निकुंडात समिधा अर्पण करत असतो. देवता प्रसन्न होऊन “तथास्तु’ म्हणतील, साऱ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील या हेतूने यजमान यज्ञाचे आयोजन करत असतो.  व्यापाररूपी यज्ञात हा यजमान कोण आहे? हा यजमान एक शेअरहोल्डर आहे जो कोणत्या तरी एका धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करतो... ज्यामुळे त्याला धंद्यात नफा मिळू शकेल. जर एखाद्या कार्यस्थळाला यज्ञ मानले गेले तर यजमान म्हणजे तिथला कर्मचारी जो आपले कौशल्य पणाला लावून नोकरी करतो. त्या बदल्यात त्याला पगार मिळतो आणि वेळोवेळी इन्क्रिमेंटही ज्याची तो अपेक्षाही करत असतो. तिथला ग्राहकही एक प्रकारचा यजमानच आहे जो पैसे खर्च करतो आणि त्या बदल्यात उत्तम प्रॉडक्ट वा उत्तम सेवेची अपेक्षा ठेवत असतो. त्यामुळे असे म्हणता येईल की देवाणघेवाणीसंबंधीची प्रत्येक कृती ही यज्ञाप्रमाणे आहे. जो व्यक्ती ही देवाणघेवाण सुरू करतो तो यजमान आहे आणि जो ही देवाणघेवाण संपवतो तो “देव’ आहे. “स्वाहा’ इन्व्हेस्टमेंट आहे आणि “तथास्तु’ या इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारा नफा आहे. सगळे जण अर्पण करतात आणि बदल्यात फळाची अपेक्षा ठेवतात. तुम्ही यजमान असा वा भगवान, एक गोष्ट निश्चित केली जाते ती म्हणजे एका आदर्श यज्ञात यजमान आणि देव दोघेही प्रसन्न झाले पाहिजेत, तेव्हाच अपेक्षित फळ मिळेल. आधुनिक व्यवस्थापनाबद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे सध्या फक्त स्वाहा आणि तथास्तु म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून मिळणारा नफा याकडेच अधिक लक्ष दिले जाते. आधुनिक व्यवस्थापनात या स्वाहा आणि तथास्तुचा अंदाज लावता येऊ शकतो आणि त्याला हवे तसे नियंत्रितही करता येऊ शकते. व्यवस्थापनाच्या या यज्ञात अगोदरच निश्चित केले जाते की त्याचे फळ कशा प्रकारचे हवे आहे. ज्या फळाची आपण अपेक्षा ठेवली आहे त्यानुसारच यज्ञसामग्री अर्पण केली जाते. या यज्ञाचे हेदेखील वैशिष्ट्य आहे की इथे यजमान आणि भगवान कोण आहे याला महत्व नाही. महत्त्व तर “स्वाहा’ म्हणजे अर्पण केली जाणारी सामग्री म्हणजे इन्व्हेस्टमेंटला आहे. या इन्व्हेस्टमेंटमुळेच फळ म्हणजे नफा निश्चित होणार आहे... यजमान किंवा त्याच्या भावनेवर नव्हे आणि देवावरही नव्हे. वेदांमध्ये मात्र पारंपरिक यज्ञामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व यजमानाच्या भावनेला देण्यात आले आहे. कोणत्या भावनेने, श्रद्धेने यजमान देवाशी नातं जोडतो हे महत्त्वाचे आहे. देवाशी असलेल्या नात्यासोबतच यजमानाचे स्वत:शी असलेले नातेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यज्ञाचे आयोजन कशा प्रकारे होणार हे यजमानाच्या दृष्टिकोनावर, विचारांवर आणि विश्वाशी असलेल्या त्याच्या नात्यांवर अवलंबून असणार आहे. जर यजमान बदलला म्हणजे त्याच्या जागी दुसरा कोणी यजमान आला तर त्याच्या भावना वेगळ्या, दृष्टिकोन वेगळा असणार आहे. त्याचा परिणाम यज्ञातून मिळणाऱ्या फळावरही होणार आहे. म्हणजे यजमान बदलला तर फळही बदलणार. म्हणूनच यजमानाच्या सच्चेपणावर हे अवलंबून आहे. यज्ञाचे तसे वेगळे अस्तित्व नाही. आधुनिक व्यवस्थापनाच्या या यज्ञाला एका उदाहारणाद्वारे समजून घेऊया. त्यासाठी फास्ट फूडच्या आउटलेटचे देतो. आधुनिक व्यवस्थापनामध्ये प्रोसेसला अत्यंत महत्त्व आहे. आउटलेटच्या काऊंटरवर काम करणाऱ्या साधना नामक व्यक्तीला असे सांगण्यात आले आहे की, प्रत्येक ग्राहकाला समान अनुभव मिळायला हवा. साधनाला हिंदी भाषा अतिशय व्यवस्थित येते. परंतु “प्रत्येक ग्राहकाला समान अनुभव’ असा आदेश असतानाही ती ग्राहकांशी इंग्रजी भाषेतच संवाद साधते भले समोरच्याला इंग्रजी येत नसते तरीही. इथे प्रत्येक कर्मचारी नियमांना बांधील आहे. वैयक्तिक विचार आणि आवडीनिवडीला इथे थारा नाही. बरं साधनाला चांगला पगार मिळतो. त्यामुळे साधनाने दु:खी होण्याचे तसे कारणही आऊटलेटच्या मालकाला दिसत नाहीये. त्यामुळे ही अतिशय आश्चर्याची बाब आहे की, या प्रोसेसनुसार साधना आणि तिच्यासारखे अनेक कर्मचारी संतुष्ट नाहीत, उलट आज्ञेचे पालन करणारी पाळीव प्राणी आहेत... हा यज्ञ नव्हे, इथे यजमानही नाही आणि भगवानही...