आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी FD मध्ये तुमचा पैसा सुरक्षित आहे का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिक्स्ड डिपॉझिट एक साधासोपा गुंतवणुकीचा पर्याय आहे, जो सामन्यतः बँक, पोस्टऑफिस, नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीद्वारे (NBFC) जारी केले जातात, परंतु कंपनी फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून तुम्ही सर्वात आकर्षक व्याजदर प्राप्त करू शकता. कंपनी आणि बँकांच्या व्याज दरामध्ये अनेकवेळा 50-100 bps बेसिस पॉईंट्सचे अंतर असते. ज्येष्ठ नागरिकांना कंपनी FD वर नियमित व्याजाव्यतिरिक्त 25-40 bps जास्त व्याज जमा करते परंतु यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सुरक्षित फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे. अनेक कंपन्या FD ऑप्शनमध्ये जास्तीतजास्त व्याजदर देण्याचे आश्वासन देतात, परंतु तुमच्या पैशांच्या सुरक्षेची गॅरंटी नसते. यामुळे व्याज मिळण्यात उशीर किंवा नुकसान होण्याची शक्यता वाढते. बाजारात अशाप्रकारे विविध FD उपलब्ध आहेत. यामुळे खाली अशा काही गोष्टीविषयी सांगण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा फायनान्सर किती सुरक्षित आहे समजण्यास मदत होईल.

कंपनीची विश्वासार्हता रेटिंग तपासा
बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या FD ला सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. कारण यांना सरकारचे समर्थन मिळते आणि यांवर RBIचे नियंत्रण असते. अगदी अत्यंत बिकट परिस्थितीतही डिपॉझिट विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आपल्या ठेवींचा वर्षाकाठी एक लाख रुपयांपर्यंत विमा उतरवते. मात्र कंपनी FD मध्ये अशाप्रकारची कोणतीही गॅरंटी नसते. म्हणूनच, सर्वात सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे रेटिंग तपासणे हा सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

CRISIL, CARE आणि ICRA यांसारख्या क्रेडिट रेटिंग संस्था, आर्थिक धोका, कर्ज फेडण्याची क्षमता, व्यावसायिक धोका आणि व्यवस्थापनाच्या आधारवर कंपनी FDs ला रेटिंग देतात. उदाहरणार्थ, CRISIL मुद्दल तसेच व्याज देयकाच्या बाबतीत सर्वाधिक सुरक्षा असणार्‍या कंपनीला 'FAAA' रेटिंग देते. सुरक्षा जसजशी कमी होते, रेटिंगमध्ये 'A' ची संख्याही त्याच प्रमाणात कमी होते. यामुळे ज्या कंपनीचे रेटिंग AAA किंवा AAपेक्षा कमी नाही अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट हे गुंतवणूकीचे सर्वात सुरक्षित साधन आहे. स्थिरतेच्या बाबतीत CRISILने FAAA आणि ICRAकडून MAAA रेटिंग देण्यात आली आहे. S&P ग्लोबलच्या '-BBB' च्या आंतरराष्ट्रीय रेटिंगसह, बजाज फिनसर्व्ह आपल्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय बनतो, जेथे आपण आपले पैसे गुंतवू शकता.

कंपनीच्या ग्राहकांची संख्या
एखाद्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या पडताळून पाहणेसुद्धा सुनिश्चित करते की कंपनी सुरक्षित आहे की नाही. एका मोठ्या ग्राहक कंपनीवरून हे लक्षात येते की, कंपनीकडे ग्राहकांना सांभाळण्याचा अनुभव आहे आणि ते ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी तयार आहेत. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स FD च्या संतुष्ट ग्राहकांची संख्या 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यावरून खात्री मिळते की कंपनी तुम्ही केलेली गुंतवणूक सुरक्षितरित्या सांभाळ्यास सक्षम आहे. यासोबतच मदतीची आवश्यकता भासल्यास तुम्हाला उच्चस्तरीय ग्राहक सेवा दिली जाईल.

कंपनीचे डिपॉझिट बुक साइज
कंपनीच्या ग्राहकांची संख्या तपासण्याशिवाय या गोष्टीवरही लक्ष द्या आणि ग्राहकांकडून कंपनीत जमा केलेल्या पैशांची माहिती मिळवा. यामुळे कंपनीबद्दल ग्राहकांचा विश्वास समजतो. उदाहरणार्थ, बजाज फायनांसचे बुक साइज 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, जो खूप प्रभावशाली आहे. याचा अर्थ असा की, भारतीय गुंतवणूदार या लाभदायक आणि विश्वासहार्य साधनातून आपली संपत्ती वाढवत आहेत.

कंपनीत गुंतवणूकीत करणा-या ज्येष्ठ गुंतवणुकदांना विश्वास...
ज्येष्ठ नागरिक कमी जोखिम घेऊ इच्छितात आणि त्यामुळेच ते गुंतवणुकीसाठी जोखिम नसतील अशा गुंतवणुकीकडे आकर्षित होतात. म्हणूनच ज्या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असते, तिच कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य समजली जाते. बजाज फायनान्स 61000 ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा पुरवते. एकंदरीत या कंपनीचे बुक-साइजमधील योगदान सुमारे 3,300 कोटी रुपये आहे. NBFC एफडी व्याज दरांपेक्षा 0.35% अधिक व्याज देत आहे. त्यामुळे हे अधिक लाभदायक आहे. 

कमीतकमी 36 महिन्यांच्या एफडीच्या गुंतवणुकीवर बजाज फायनान्सकडून  8.70% व्याज दिलं जातंय. शिवाय एफडीवर 4 लाखांपर्यंत कर्जाची सोय उपलब्ध आहे. याशिवाय मल्टी डिपॉझिट सुविधाच्या माध्यमातून तुम्ही एकल चेकच्या माध्यमातून अनेक डिपॉझिटमध्येही गुंतवणुक करु शकता. NBFC कडून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार 1 ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीचा पर्याय उपलब्ध आहे. एका सामान्य गुंतवणुकदार म्हणून चांगला मोबदला मिळवण्यासाठी खाली दिल्या गेलेल्या उदाहरणांवर एक नजर टाका...

जमा राशीकालावधीव्याजदर अर्जित व्याजमॅच्युरिटी राशी

1,00,000

5 वर्ष

8.35%

49,329

1,49,329

2,00,000

5 वर्ष

8.35%

98,658

2,98,658

5,00,000

5 वर्ष

8.35%

2,46,646

7,46,646

या 4 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही एका विश्वासू कंपनीमध्ये सहजपणे FD करू शकता. तुम्हाला आता लगेच बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर फक्त बजाज फायनान्स ऑनलाईन FD फॉर्म भरा आणि यासोबत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा लाभ घ्या.

बातम्या आणखी आहेत...