आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​ईशा अंबानीचा जिथे झाला साखरपुडा ते आहे सेलेब्सचे आवडते ठिकाण, 2 मिनिटांच्या व्हिडिओत फिरुन या 'लेक कोमो'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद यांचा शुक्रवारी (21 सप्टेंबर) इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे सेलिब्रेशन 23 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. लेक कोमो आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. येथील डेल बालबियानोमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंचे लग्न झाले आहे. याच ठिकाणी हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी आणि रिचर्ड ब्रेसनन यांचा महाल आहे. याशिवाय मडोना आणि जिआनी वर्सासे यांच्या फेव्हरेट डेस्टिनेशनमधील हे ठिकाण आहे. लेक कोमोला लोक 'लागो दी कोमा' अर्थात लेक ऑफ कोमा म्हणतात. याचे नाव कोमो शहरावरुन पडले आहे. रोमनवासी याला कॉमूम म्हणून संबोधतात. लेक कोमो इटलीतील तिसरे मोठे सरोवर असून ते 46 स्वेअर मीटरमध्ये पसरले आहे. येथे येणारा प्रत्येकजण याचे सौंदर्य बघून त्याच्या प्रेमात पडतो. हिरवेगार गार्डन, लग्झरी व्हिला आणि सुंदर विलेज येथे आहेत. लेक कोमो इटलीतील मिलान शहरापासून तासाभराच्या अंतरावर आहे. अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह  यांचेही हे आवडते ठिकाण आहे. व्हिडिओत बघा, किती सुंदर आहे हे ठिकाण... 

बातम्या आणखी आहेत...