आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी बोहल्यावर चढणार आहे ईशा अंबानी, मुलीची पाठवणी केल्यानंतर सूनेचे स्वागत करणार अंबानी कुटुंबीय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचे लग्न ठरले असून आनंद पीरामल हे तिच्या भावी पतीचे नाव आहे. आज म्हणजे 21 सप्टेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे दोघांचा साखरपुडा होणार आहे. तब्बल तीन दिवस लेक कोमा येथे साखरपुड्याचा जल्लोष सुरु राहणार आहे. प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी पीरामल रियल्टीचे संस्थापक अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत ईशा विवाहबद्ध होणार आहे. गेल्या चार दशकांपासून पीरामल आणि अंबानी कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध आहेत. 


12 डिसेंबरच्या मुहूर्तावर बोहल्यावर चढणार ईशा-आनंद... 
खरं तर ईशापूर्वी तिचा भाऊ आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहतासोबत झाला होता. त्यामुळे ईशापूर्वी आकाशचे लग्न होणार असे म्हटले गेले होते. पण आता वृत्त आहे की, मुकेश अंबानी पहिले मुलीचे आणि नंतर मुलाचे लग्न करणार आहेत. आकाश अंबानीचे लग्न 2019 मध्ये होणार असून ईशा याच वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ईशा आणि आनंद यांच्या लग्नासाठी 12 डिसेंबरचा मुहूर्त निश्चित झाला असून लग्नसोहळा मुंबईत होणार आहे. अर्थातच मुलीची पाठवणी केल्यानंतर मुकेश आणि नीता अंबानी सूनबाईंचे स्वागत करणार आहेत. 


उद्यपूरमध्ये होणार प्री-वेडिंग पार्टी..
21 सप्टेंबर रोजी इटलीत ईशा आणि आनंद यांचा साखरपुडा होतोय. तर लग्नाची प्री-वेडिंग पार्टी उदयपूर येथे होणार आहे. अंबानी आणि पीरामल कुटुंबीय पाहुण्यांसाठी हॉटेल फायनल करत आहेत. प्री वेडिंग पार्टी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.  


2019 मध्ये होणार आकाश-श्लोकाचे लग्न
ईशा आणि आनंद यांच्या लग्नानंतर आकाश आणि श्लोका यांचे लग्न 2019 मध्ये मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...