आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीच्या या नयनरम्य ठिकाणी होतोय अंबानींच्या लेकीचा साखरपुडा, दीपिका-रणवीर येथेच थाटणार आहेत लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद यांचा शुक्रवारी (21 सप्टेंबर)  इटलीतील लेक कोमो येथे साखरपुडा होणार आहे. साखरपुड्याचे सेलिब्रेशन 23 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. मुकेश आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी तीन दिवसीय लॅव्हिश एंगेज्मेंट पार्टी होस्ट करणार आहेत. ईशा आणि आनंद यांचे याचवर्षी डिसेंबर महिन्यात उदयपूर येथे लग्न होणार आहे. 


हॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते डेस्टिनेशन... 
लेक कोमो आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. येथील डेल बालबियानोमध्ये अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंचे लग्न झाले आहे. याच ठिकाणी हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी आणि रिचर्ड ब्रेसनन यांचा महाल आहे. याशिवाय मडोना आणि जिआनी वर्सासे यांच्या फेव्हरेट डेस्टिनेशनमधील हे ठिकाण आहे.

 

लेक कोमोला लोक 'लागो दी कोमा' अर्थात लेक ऑफ कोमा म्हणतात. याचे नाव कोमो शहरावरुन पडले आहे. रोमनवासी याला कॉमूम म्हणून संबोधतात. लेक कोमो इटलीतील तिसरी मोठी लेक असून ती 46 स्वेअर मीटरमध्ये पसरली आहे. येथे येणारा प्रत्येकजण याचे सौंदर्य बघून त्याच्या प्रेमात पडतो. हिरवेगार गार्डन, लग्झरी व्हिला आणि सुंदर विलेज येथे आहेत. लेक कोमो इटलीतील मिलान शहरापासून तासाभराच्या अंतरावर आहे. अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह  यांचेही हे आवडते ठिकाण आहे.


दीपिका-रणवीरसुद्धा लेक कोमोमध्ये थाटू शकतात लग्न...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका-रणवीरसुद्धा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लेक कोमोमध्ये सात फेरे घेऊ शकतात. यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीतील टस्कनीमध्ये लग्न केले होते. 

 

असा आहे ईशा-आनंद याचा एंगेज्मेंट कार्यम... 

21 सप्टेंबर 
दुपारी अंबानी कुटुंबीय पाहुण्यांना वेलकम लंच देतील. संध्याकाळी पाच वाजता लेक कोमोच्या व्हिला बालबियानोमध्ये डिनर प्रोग्राम ठेवण्यात आला आहे.


22 सप्टेंबर  
सेलिब्रेशनच्या दुस-या दिवशी व्हिला गेस्टलमध्ये इटॅलियाना फिएस्टा होणार आहे. शनिवारी रात्री व्हिला ओल्मो येथे पाहुण्यांसाठी डिनर आणि डान्स प्रोग्राम असेल.


 23 सप्टेंबर
रविवारी सेलिब्रिटी आणि पाहुण्यांसाठी ड्यूमो डी कोमोमध्ये लंचचा प्रोग्राम असेल.

 

असा असेल ड्रेस कोड...

- तीन दिवस चालणा-या या सेलिब्रेशनसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 21 सप्टेंबर रोजी पाहुण्यांना कॅज्युअल चिक ड्रेस परिधान करावा लागले. तर संध्याकाळी डिनरमध्ये ब्लॅक टाय इव्हेंट असेल. पाहुणे इंडियन फॉर्मल ड्रेसही परिधान करु शकतात.


- शनिवारी 22 सप्टेंबर रोजी इटॅलियन फिएस्टामध्ये पाहुणे कोमो चिक ड्रेसमध्ये दिसतली. तर डिनर आणि डान्स इव्हनिंगमध्ये पाहुणे कॉकटेल अटायरमध्ये दिसतील. 


- रविवारी 23 सप्टेंबर रोजी फेअरवेल लंचचा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी स्मार्ट कॅज्युअल ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 


अशी आहे ईशा आणि आनंद यांची लव्ह स्टोरी...
आनंद पीरामल यांनी याचवर्षी महाबळेश्वरच्या एका मंदिरात ईशाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी त्यांच्या आईवडील आणि कुटुंबीयांसोबत लंच करुन हा आनंद साजरा केला होता. यावेळी दोघांचे आईवडील नीता-मुकेश अंबानी आणि स्वाती-अजय पीरामल उपस्थित होते. याशिवाय ईशाची आई कोकिलाबेल अंबानी, पूर्णिमाबेन दलाल, ईशाचे दोन्ही भाऊ आकाश आणि अनंत अंबानी. आनंदची बहीण नंदिनीसह कुटुंबीताल इतर सदस्यही उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...