आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंटिलियात सुरू झाले ईशा अंबानीच्या लग्नाचे कार्यक्रम, पाहा Photos....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंबानी परिवारच्या एंटीलियात ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. एंटिलियामध्ये लग्नाआधी दांडिया नाइटचे आयोजन केले आहे. रिलायंस इंडस्ट्रीज (RIL)चे चेअरमॅन आणि आशियाचे सगळ्यात श्रीमंत उद्योगपति मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीचे लग्न पीरामल ग्रुपचे प्रमुख अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्या सोबत 12 डिसेंबरला मुंबईमध्ये त्यांच्या घरात म्हणजेच एंटीलियात होत आहे.

सुरू झाली ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी
ईशा अंबानीच्या लग्नाआधी 16 नोव्हेंबरला दांडिया नाइटचे आयोजन केले आहे. यात नीता अंबानी आणि ईशा अंबानीने फॅशन डिझाइनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले कपडे घातले.

उदयपुरमध्ये होतील लग्नाआधीचे कार्यक्रम
अंबानी आणि पीरामल उदयपुरमध्ये लग्ना आधीचे कार्यक्रम करणार आहेत. हे कार्यक्रम 8 आणि 9 डिसेंबरला होतील. या कार्यक्रमात बिझनेस, स्पोर्ट्स, एंटटेनमेंट आणि राजकारणातील लोक येणार आहेत. येथे इंटरनॅशनल सिंगर बियॉन्से परफॉर्म करणार आहेत. 12 डिसेंबरला लग्न मुकेश अंबानीच्या एंटीलियात होईल.

भारतीय चालीरिती प्रमाणे होईल लग्न
ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे लग्न प्राइ‌वेट होईल आणि यात परिवारातील पाहूणे आणि मित्र असतील. 

 

बातम्या आणखी आहेत...