आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBA ग्रॅज्यूएट आहे ईशा अंबानी, जगातील टॉप यूनिव्हर्सिटीमध्ये घेतले आहे शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधून एक असलेल्या मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी हिचा आज साखरपुडा आहे. प्रसिध्द उद्योगपती आनंद पिरामलसोबत तिची एंगेजमेंट होणार आहे. आज आपण ईशाच्या शिक्षणाविषयी जाणुन घेऊया. ईशा ही एमबीए ग्रॅज्यूएट आहे. तिने ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझनेस इन स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून एमबीएची डिग्री मिळवली आहे. तिच्या यूनिव्हर्सिटीविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 
- ईशा अंबानीने यूनिव्हर्सिटीच्या 127 व्या वर्षी ग्रॅज्यूएटची डिग्री मिळवली आहे. ईशा ही एमबीएची डिग्री घेणा-या 2460 विद्यार्थ्यांपैकी एक आहे. 

- स्टॅनफोर्ड जगातील टॉप यूनिव्हर्सिटीमधून एक आहे आणि हे जगातील चौथ्या स्थानावर आहे. 
- या यूनिव्हर्सिटीमधील अनेक कोर्स खुप प्रसिध्द आहेत. 
- यूनिव्हर्सिटीच्या वेबसाइटनुसार एमबीए कोर्सच्या शिक्षणासाठी उमेदवारांना पहिल्या वर्षात एका क्वार्टरसाठी 22,956 डॉलर मोजावे लागतात. म्हणजेच पहिल्या वर्षाची ट्यूशन फीस 6152208 रुपये आहे. 
- तर दूस-या वर्षाच्या शिक्षणामध्ये एका क्वार्टरची फीस 22,180 डॉलर आहे. म्हणजेच 5944240 रुपये द्यावे लागतात. ही फक्त ट्यूशन फीस आहे, या व्यतिरिक्त शिक्षणासाठी उमेदवारांना डॉक्ऊमेंट फीस, हेल्थ इंश्योरेंस, स्पेशल फीस, हाउसिंग फीस, मील प्लान इत्यादी पैसे भरावे लागतात.
- रिपोर्ट्सनुसार यापुर्वी ईशाने सायकोलॉजीमध्ये बॅचलर डिग्री घेतली होती. आता ती एमबीए ग्रॅज्यूएट झाली. तिने McKinsey and Company मध्येही काम केले आहे. 
- ईशाचा साखरपुडा अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत होणार आहे. 
- 2015 मध्ये फोर्ब्सच्या पावर बिझनेसवुमेनच्या लिस्टमध्ये ईशाचे नाव होते. या वर्षी ईशाने वर्ल्ड इकोनॉमिक फॉर्ममध्ये सहभाग घेतला होता. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...