Home | National | Delhi | Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur

प्री-वेडिंग सेरेमनी: 'अन्न सेवा'करत ईशा अंबानीने स्वतः पंगतीत वाढले , मुकेश आणि नीता अंबानींनीही दिली साथ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:50 PM IST

तीन दिवस 5100 लोकांना तीन वेळा जेवण देणार

 • Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur

  उदयपूर - ईशा अंबानींच्या प्री वेडिंग सेरेमनीपूर्वी शुक्रवारी अंबानी कुटुंबाने 'अन्न सेवा' केली. एनजीओ नारायण सेवा संस्थानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुकेश अंबानी, नीता आणि स्वतः नवरी ईशाने तिच्या हाताने अनाथ मुले आणि बेघरांना जेवण वाढले.


  अंबानी कुटुंब उदयपूरमध्ये 7 ते 10 डिसेंबरपर्यंत हा 'अन्न सेवा' कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये 5100 जणांना दिवसातून तीनवेळा असे तीन दिवस भोजन दिले जाणार आहे. यामध्ये बहुतांश दिव्यांग मुलांचा समावेश असणार आहे. शुक्रवार झालेल्या अन्नसेवा कार्यक्रमात ईशाचा पती आनंद पिरामल, त्यांचे वडील अजय आणि आई स्वाती पिरामल हेही उपस्थित होते.


  पाहुण्यांची वर्दळ वाढली
  प्री वेडिंग सेरेमनीसाठी देश-विदेशातील पाहुण्यांची वर्दन उद्यपूरमध्ये वाढली आहे. शुक्रवारी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे उदयपूरला पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही आहेत. त्यांच्याशिवाय डायरेक्टर विधू विनोद चोप्रा पत्नी अनुपमासह पोहोचले. त्याशिवाय रात्री उशिरा अनिल कपूर आणि डेवीड धवनही उदयपूरला पोहोचले.

 • Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur
 • Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur
 • Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur
 • Isha Ambani serves food Anna Seva programme in Udaipur

Trending