आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिरसा मुंडाच्या भूमिकेत दिसू शकतो ईशान खट्‌टर, महाश्वेतादेवीच्या 'जंगल के दावेदर' कादंबरीवर असेल आधारित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दाक्षिणात्य दिग्दर्शक पा. रंजित झारखंडचा नायक बिरसा मुंडावर बायोपिक बनवणार आहेत. हा चित्रपट बंगालच्या चर्चित साहित्यकार महाश्वेतादेवीच्या कादंबरी 'जंगल के दावेदर'वर आधारित असेल. शाहिद कपूरचा छाकटा भाऊ ईशान खट्टरच्या खात्यात आणखी एक मजेदार चित्रपट येऊ शकतो. तो झारखंडचा नायक बिरसा मुंडाच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारू शकतो. हा चित्रपट ईशानच्या पहिल्या 'बियाँड द क्लॉउड्स' चित्रपटाचे निर्माते शैरीन मंत्री केडिया आणि किशोर अरोरा मिळून बनवणार आहेत. तसेच रजनीकांत स्टारर 'काला' आणि 'कबाली'सारखे चित्रपट बनवणारे पा. रंजित दिग्दर्शित करतील. हा बायोपिक मूळ बंगालच्या चर्चित साहित्यकार महाश्वेतादेवीचे साहित्य 'जंगल के दावेदर'वर आधारित असेल. निर्माती शारीन सांगते, 'बायोपिकच्या या काळात आम्ही आणखी एक बायोपिक घेऊन येत आहोत. बिरसाची कथा प्रेरक आहे. तरुणांना ती प्रेरित करेल. मुळे, जमीन आणि जंगलाविषयीदेखील त्यांची काही जबाबदारी आहे. ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. या तिघांची सुरक्षा करणे सर्वांची जबाबदारी आहे. सध्या चित्रपटावर काम सुरू आहे. आम्ही पुढच्या वर्षी शूटिंग सुरू करणार आहोत. सध्या कलाकारांची निवड झाली नाही, पण आम्ही कमी वयाचा कलाकार शोधत आहोत. बिरसाने २४ व्या वर्षीच खूप काही मिळवले हेाते.' 


लवकरच कलाकाराविषयी सांगणार 
या चित्रपटात पुन्हा एकदा तू ईशान खट्टरबरोबर काम करशील का ? असे शारूनला विचारले असता ती म्हणाली, 'सध्याच आम्ही काही सांगू शकत नाही. पण आम्ही लवकरच याविषयी सांगू.' दिग्दर्शक पा. रंजित यांनी सात वर्षांपूर्वी महाश्वेतादेवीच्या पुस्तकात बिरसा मुंडाबद्दल वाचले होते.ते बिरसाच्या उल्लेखनीय प्रवासाने आश्चर्यचकित झाले होते. तेव्हाच त्यांनी याचित्रपटवर काम करण्याचे निश्चित केले होते. 

बातम्या आणखी आहेत...