आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ishant's 4 Wickets After The Century Of Shikhar Dhawan Follow up From Delhi To Hyderabad The Next Day

शिखर धवनच्या शतकानंतर ईशांतचे 4 बळी, दिल्लीकडून हैदराबादला दुसऱ्या दिवशी फॉलोऑन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : शिखर धवनच्या (१४०) शतकानंतर इशांत शर्माच्या (४-१९) भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्लीने रणजी ट्रॉफीत मजबूत स्थिती मिळवली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिल्लीने पहिल्या डावात ६ बाद १६९ धावांच्या पुढे खेळताना टीम ७१.४ षटकांत २८४ धावांवर सर्वबाद झाली. प्रत्युत्तरात हैदराबाद टीम २९ षटकांत अवघ्या ६९ धावांवर ढेपाळली. त्याचे आठ खेळाडू दहाचा आकडा देखील गाठू शकले नाहीत. बी. संदीपने १६ धावा केल्या. इशांतसह सिमरनजीतनेदेखील चार बळी घेतले. दुसऱ्या दिवस अखेर हैदराबादने फॉलोऑन खेळताना २० धावांत २ गडी गमावले. ते अद्याप १९५ धावा पिछाडीवर आहे.
इतर एका सामन्यात पुदुचेरीकडून खेळताना पारस डोग्राने मिझोरम विरुद्ध २०० धावा ठोकल्या. प्रथम श्रेणीत त्याचे हे नववे दुहेरी शतक आहे. पुजाराने सर्वाधिक १२ वेळा अशी कामगिरी केली. पुदुचेरीने पहिला डाव ५ बाद ४५८ धावांवर घोषित केला. मिझोरमने पहिल्या डावात ७३ धावा केल्या. दिवस अखेर मिझोरमने दुसऱ्या डावात ३० धावांत ४ गडी गमावले.
 

बातम्या आणखी आहेत...