Home | International | Other Country | isi have no clean chit- us

आयएसआयचा दोष नाही असे कोठेही म्हटले नाही- अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

agency | Update - May 28, 2011, 04:26 PM IST

वॉशिंग्टन - अल कायदा संघटनेचा प्रमुख मोरक्या ओसामा बिन लादेन याचा काही महिने मुक्काम पाकिस्तानमध्येच होता यासंदर्भात आयएसआयचा काहीही दोष नाही, असे अधिकृतरित्या कोठेही म्हटले नसल्याचा खुलासा अमेरिकेतर्फे करण्यात आला आहे.

  • isi have no clean chit- us

    वॉशिंग्टन - अल कायदा संघटनेचा प्रमुख मोरक्या ओसामा बिन लादेन याचा काही महिने मुक्काम पाकिस्तानमध्येच होता यासंदर्भात आयएसआयचा काहीही दोष नाही, असे अधिकृतरित्या कोठेही म्हटले नसल्याचा खुलासा अमेरिकेतर्फे करण्यात आला आहे.

    परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी यांनी अचानकपणे शुक्रवारी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध लादेनवरील कारवाईनंतर काहीसे ताणलेले आहेत. यावरुन दोन देशांत घडू लागलेला विसंवाद टाळण्यासाठी क्लिंटन यांनी पाकिस्तानात येऊन भेट घेतली. यावेळी क्लिंटन यांनी आयएसआय ला कोणत्याही प्रकारची क्‍लीन चीट दिली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते मार्क टोनर यांना ठासून सांगावे लागले.

Trending