आयएसआयला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी दबाव वाढणार

agencies | Update - May 29, 2011, 02:38 PM IST

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा मार्गा सोपा होण्याची चिन्हे आहेत. यासाठी भारत पुढाकार घेऊ शकतो.

  • isi-terrorism

    पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा मार्गा सोपा होण्याची चिन्हे आहेत. यासाठी भारत पुढाकार घेऊ शकतो. न्युयॉर्कच्या एका न्यायालयात 26/11च्या हल्ल्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रब्बी गॅब्रियल आणि त्यांची पत्नी रविका यांच्या कुटुंबियांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आयएसआयला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे. आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा यांना त्यांनी 26/11च्या हल्लयासाठी जबाबदार मानले आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनेक गोष्टींचे पुरावे सादर होतील. हल्लेखोरांनी केलेले सं½ााषण, त्यांच्या कॉल्सचे रेकॉर्ड तसेच इतर तपशील सादर होतील. हे पुरावे न्यायालयाने मान्य केल्यास आयएसआयला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यास अडचण येणार नाही. भारतानेही याकरीता पुर्ण तयारी केली आहे. आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा यांचे संबंध असल्याचे भारताकडे ठोस पुरावे आहेत. भारताला या खटल्यात बाजू मांडण्याची संधी मिळाल्यास हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करता येतील. याची ½ाारताला मदत होईल, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगीतले. 26/11च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हीड हेडली याने नुकतेच शिकागोच्या न्यायालयात अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे आयएसआयवरील आरोप आणखी बळकट झाले आहेत. हे आरोप न्यायालयाने मान्य केल्यास आयएसआयला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याबाबत अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव वाढू शकतो.

Trending