आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांची सुटका, 10 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सुटकेचे आदेश येथील इस्लामाबाद हायकोर्टाने दिले आहेत. शरीफांसोबत त्यांची मुलगी मरियम नवाज हिला देखील सोडण्यात आले आहे. पनामा पेपर्स प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरीफांना 10 वर्षांची कैद झाली. याच प्रकरणामुळे त्यांना आपले पंतप्रधान पद गमवावे लागले. परंतु, इस्लामाबाद हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा देत झालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, नवाज शरीफ अवघ्या 2 महिन्यांत तुरुंगाबाहेर आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या आठवड्यातच शरीफांच्या पत्नी कुलसूम यांचे लंडनमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर कोर्टाचा आदेश आला आहे. 

 

10 वर्षांची शिक्षा, 2 महिन्यांतच तुरुंगाबाहेर...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या अकाउंटेबिलिटी कोर्टाने (भ्रष्टाचार विरोधी न्यायालय) ही शिक्षा सुनावली होती. ऐन निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले. 10 वर्षांची कैद झाल्यानंतर ते गेल्या 2 महिन्यांपासून तुरुंगातच होते. या दरम्यान त्यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाच्या निकालास हायकोर्टात आव्हान दिले. गेल्या आठवड्यातच कुलसूम नवाज यांचे लंडनमध्ये निधन झाले. त्यावेळी अंत्यविधीसाठी दोघांना तात्पुरते जामीन मिळाले होते. परंतु, इस्लामाबाद हायकोर्टाने आता बुधवारच्या निकालात शिक्षेच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. तसेच नवाज आणि मरियम या दोघांच्या तत्काळ सुटकेटे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...