आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात दोन हिंदू मुलींचे धर्मांतर व मुस्लिम पुरुषांशी बळजबरी विवाह झाल्याच्या प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी दोन्ही बहिणींना आपल्या पतींसोबत राहण्याची परवानगी दिली.
‘डॉन’च्या वृत्तानुसार या प्रकरणातील तपास आयोगाने अहवाल सादर केला. दोन्ही बहिणींचा बळजबरीने निकाह झाला नसल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. त्याचबरोबर धर्मांतरदेखील बळजबरीने झालेले नाही. या दोघींचा वैद्यकीय अहवाल आला असून त्यात दोघीही सज्ञान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारताने दोन्ही बहिणी सज्ञान नसल्याचा हवाला देत बळजबरी विवाहास विरोध दर्शवला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारने प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु बहिणींनी न्यायालयात पतींसोबत राहण्याचीच इच्छा व्यक्त करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हा निवाडा केला.
रेडिआेलॉजी विभागाचा अहवाल महत्त्वाचा : पाकिस्तानच्या चिकित्सा विज्ञान संस्थेच्या रेडिआेलॉजी विभागाने दोन्ही बहिणींच्या वयासंबंधीचा अहवाल सादर केला. त्यात विवाहावेळी दोन्ही बहिणी सज्ञान होत्या. तेव्हा रविनाचे वय साडे एकोणीस तर रिनाचे साडे अठरा वर्षे असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यासाठी दोन्ही बहिणींच्या हाडांचा एक्स-रे काढून वय लक्षात घेण्यात आले
या बहिणींच्या कुटुंबियांनी रवीनाचे वय १३ तर रिनाचे वय १५ वर्षे होते, असे म्हटले होते. त्यांचा बळजबरी विवाह व बळजबरी धर्मांतर झाल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर भारत सरकारने या प्रकरणी विरोध दर्शवला होता. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले होते.
पाच सदस्यीय आयोगाची स्थापना, सुरक्षा देण्याचे आदेश
न्यायालयाने या प्रकरणात पाच सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. त्यात बळजबरी धर्मांतर व विवाह केला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. गृहसचिवांना दोन्ही बहिणी व त्यांच्या पतींना सुरक्षा देण्याचेही आदेश देण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.