IS दहशतवाद्यांनी बेशुद्ध / IS दहशतवाद्यांनी बेशुद्ध होईपर्यंत केला होता Rape, चार वर्षांनी तिच्या जीवनात परतला आनंद

दिव्य मराठी वेब टीम

Aug 22,2018 05:04:00 PM IST

बर्लिन - IS च्या दहशतीत सेक्स स्लेव्ह म्हणून राहिलेल्या एका यहुदी तरुणी मुराद हिच्या जीवनात 4 वर्षांनी आनंदाचे क्षण परतले आहेत. नादियाने ट्विटरवर तिच्या एंगेजमेंटचे पोटो शेअर केले. कॅम्पेन वर्कदरम्यान भेट झालेल्या मित्राबरोबर जीवन व्यतित करण्याचा निर्णय तिने घेतला. नादियाला 19 वर्षांची असताना IS चे दहशतवादी उचलून घेऊन गेले होते. सुमारे तीन महिने कैदेत असताना नादियावर रोज बलात्कार केला जात होता. नादियाने जेन्हा UN च्या सुरक्षा परिषदेसमोर आपबीती सांगितली तेव्हा त्याठिकाणी बसलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते.


नादियाचे ट्वीट..


- नादियाने आबीदबरोबरच्या एंगेजमेंटचा फोटो ट्वीट करत लिहिले की, आमच्या आप्तेष्ठांच्या संघर्षामुळे आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्रच पुढील मार्गक्रमण करणार आहोत.
- नादियाने लिहिले की, आम्ही दोघे जीवनातील सर्वात कठीण काळात एकमेकांना भेटलो तरीही हा लढा देताना आम्हाला प्रेम गवसले.
- नादियाच्या एंगेजमेंट पार्टीत आलेला तिचा मित्र अहमद बोरजस म्हणाला, मी नादियाला 2015 मध्ये भेटलो. तेव्हा ती फार दुर्बल अशी महिला वाटत होती. IS च्या तावडीतून ती पळालेली होती. रडत होती आणि तिच्याबरोबर आम्ही सगळे रडत होतो. - अहमद म्हणाले, पण आता ती एक हिरो आहे. तिने अत्यंत धीराने IS बरोबर लढा दिला आणि अधिकारांसाठी लढली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे खूपच आनंददायी होते. ती आता एक छान कुटुंब तयार करण्याच्या विचारात आहे.
- नादिया मुराद बासे ताहा हिला 19 वर्षांची असताना IS चे दहशतवादी उचलून घेऊन गेले होते. दहशतवाद्यांनी तिचे 6 भाऊ आणि म्हाताऱ्या आईची हत्याही केली होती.
- नादिया तीन महिने IS दहशतवाद्यांच्या तावडीत होती. कैदेत असताना ती त्यांच्या अत्याचाराला बळी पडली होती. रोज तिच्यावर बलात्कार होत होता. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर ती जर्मनीला पोहोचली होती.


नादियाची आपबिती ऐकूण रडू लागले लोक
- नादियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांसमोर आपबीती सांगितली होती. तिने सांगितले, ISIS च्या दहशतवाद्यांनी तिला ऑगस्ट 2014 मध्ये इराकच्या एका गावातून उचलून नेले. तिच्यासमोरच तिचे भाऊ आणि आई वडिलांना मारले. ते तिला एका बसमध्ये बसवून मोसूलला घेऊन गेले. रस्त्यातही त्यांनी तिच्याबरोबर गैरव्यवहार केला. ती ओरडत राहीली पण तसे केल्यानंतर ते तिला मारत होते.
- नादियाने सांगितले की, काही दिवसांनी तिला एका दहशतवाद्याच्या ताब्यात देण्यात आले. तो रोज तिच्यावर बलात्कार करायचा. तिने पळायचा प्रयत्न केला तर एका गार्डने तिला पकडले. त्या रात्री तिला खूप मारहाण केली आणि तिला गार्ड्सच्या ताब्यात देण्यात आले. त्या रात्री गार्ड्सने तिच्यावर ती बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार केला.
- नादियाची ही आपबीती ऐकूण UN सिक्युरिटी कौंसिलच्या सदस्यांनाही रडू कोसळले होते.

X
COMMENT