आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Israel PM Benjamin Netanyahu To Visit India In September For AWACS, Air Derby Missiles Deal

सप्टेंबरमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर येणार, अवाक्स आणि डर्बी मिसाइल करार होण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम(अवाक्स) आणि एअर-टू-एअर डर्बी मिसाइलचा करार होण्याची शक्यता आहे. इस्रायलमध्ये 17 सप्टेंबरला निवडणुका होत आहेत आणि त्यामुळेच नेतन्याहू यांचा भार दौरा खूप महत्यावाच मानला जात आहे. 

भारतीय वायुसेनेने याआधीच डर्बी मिसाइल्सच्या आवश्यकतेबाबत भाष्ट केले होते आणि नेतन्याहू या दौऱ्यादरम्यान अवाक्स आणि डर्बी शिवाय इतर अनेक सुरक्षा करार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मिसाइल कराराशिवाय कृषी, जल संवर्धन आणि वेस्ट मॅनेजमेंटशी निवडीत असलेले काही महत्वाचे करार ठरू शकतात.

नेतन्याहू यांनी भारताच्या काश्मीरवरील निर्णयाचे स्वागत केले आहे
एका रिपोर्टनुसार, इस्रायलची एक अॅडवांस सिक्योरिटी टीम 2 सप्टेंबरला दिल्लीत पोहचणार आहे. ही टीम दोन्ही नेत्यांच्या मीटिंगसाठी काही महत्वाचे मुद्दे तयार करतील. त्यांची भेट कोणत्या तारखेला होणार हे अजून ठरलेले नाहीये. पण असी आशा आहे की, 7 किंवा 8 सप्टेंबरला यांची भेट होऊ शकते. 

पाकिस्तानकडे सध्या 7 चीनी अवाक्स
भारताकडे सध्या 5 अवाक्स सिस्टीम आहेत. भारत आणखीन 2 अवाक्स खरेदी करण्याच्या विचारात आहे, ज्यांना रशियातील विमान ए-50 वर लावायचे आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजूरी मिळणे बाकी आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडे 7 सिस्टीम आहेत आणि बालाकोट एअर स्ट्राइकनंतर ते याचा जास्त वापर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...