आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंजामिन नेतन्याहूंना बहुमत मिळवण्यात अपयश, दोन महिन्यांतच इस्रायलमध्ये पुन्हा होणार संसदीय निवडणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल अवीव - पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले मित्र मानणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सत्ता स्थापनेत अयशस्वी ठरले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या संसदीय निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. परंतु, 6 आठवड्यानंतरही त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आघाड्यांचे समर्थन मिळत नाही. त्यामुळेच सरकार स्थापनेसाठी होणारा विलंब पाहता संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलमध्ये आता 17 सप्टेंबर रोजी पुन्हा संसदीय निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे.


इस्रायलच्या इतिहासात प्रथमच उद्भवली अशी परिस्थिती
निवडणुकीचे निकाल लागून 6 आठवडे उलटले. तरीही संसदेत निवडून आलेले खासदार एक नेता निवडू शकले नाहीत. इस्रायलच्या इतिहासात अशी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर खासदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सद्यस्थितीला इस्रायलच्या संसदेत असलेल्या 120 खासदारांपैकी 119 खासदारांनी मतदानात सहभाग घेतला. यातील 74 खासदारांनी संसद बरखास्त करण्यास होकार दिला. तर 45 जणांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.


आतापर्यंत कुठल्याही एका पक्षाला बहुमत नाही...
बेंजामिन नेतन्याहू लगातार पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होऊन सर्वाधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या नेत्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. निवडणुका होत नाहीत तोपर्यंत तेच देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळणार आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या प्रचार सभांत जे मुद्दे मांडण्यात आले होते. त्याच मुद्द्यांवर स्पटेंबरची निवडणूक लढवली जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, इस्रायलच्या स्थापनेपासून आतापर्यंत कुठल्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. सर्वच पक्षांनी आघाड्या करून सत्ता स्थापित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...