आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलमध्ये होणार पुन्हा निवडणूक, सरकार स्थापन करण्यासाठी मध्यरात्रीची मुदत होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- इस्रायलमध्ये आता पुन्हा निवडणूक होणार आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीच्या नेतृत्वाखालील गटास आघाडी सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. 


सरकार स्थापन करण्यासाठी मध्यरात्रीची मुदत होती. निवडणुकीचा निकाल लागून सहा आठवडे उलटले तरीही नेतन्याहू यांना सरकार स्थापन करण्यात यश आले नव्हते. त्यामुळे याबाबत संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव ७४ विरुद्ध ४५ मतांनी मंजूर झाला. त्यानुसार २१ वी संसद विसर्जित करण्यावर संसदेतील सदस्यांनी काैल दिला. त्यामुळे आता अंतर्गत दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. अखेर सत्ताधारी लिकुड पार्टीने संसद बरखास्त करण्यावर सहमती दर्शवली. त्याचबरोबर राष्ट्रपती रेव्हेन रिव्हलिन इतर कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण देणार नाहीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 


वास्तविक नेतन्याहू यांचा ९ एप्रिल रोजी दणदणीत विजय झाला होता. ते पाचव्यांदा विजयी झाले होते. नागरिकांनी लष्करात सेवा देणे अनिवार्य करणाऱ्या विधेयकावरून नेतन्याहू यांचे आघाडीतील घटक पक्षांसोबत तीव्र मतभेद दिसून आले होते. 

बातम्या आणखी आहेत...