आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

58 वर्षाच्या मेहनतीने या व्यक्तीने उभारले अनोखे म्यूझियम, यातील अँटिक गोष्टीची किंमत आहे लाखांमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल : आपण आतापर्यंत अँटिक गोष्टी ठेवलेले अनेक संग्रहालय पाहिले असतील. पण आम्ही तुम्हाला अशा संग्रहालयबद्दल सांगत आहोत याबाबत तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. इस्रायलच्या हदेरा शहरात एक वेगळे संग्रहालय आहे. या संग्रहालय 37 हजार छोट-छोट्या मीठाच्या डब्ब्या ठेवण्यात आल्या आहेत. 

 

'सॉल्ट अँण्ड पेपर' असे या म्यूझियमचे नाव असून ऐतन बार-ऑन्स नावाच्या व्यक्तीने याची निर्मीती केली आहे. याठिकाणी वेगवेगळ्या आणि छोट-छोट्या तब्बल 37 हजार मीठाच्या डब्ब्यांचा त्यांने संग्रह केला आहे. हे म्यूझियम तयार करण्यासाठी ऐतनला 58 वर्षे मेहनत घ्यावी लागली. गेल्या 58 वर्षांपासून तो या डब्ब्या गोळा करत आहे. 40 हजार डब्ब्यांचा संग्रह झाल्यानंतर हे कलेक्शन बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या या डब्ब्यांची किंमत लाखो रूपये आहे. यातील सर्वात जुनी डब्बी 1703 काळातील आहे. तर सर्वात महागड्या डबीची किंमत 17 हजार डॉलर म्हणजेच 12 लाख रूपये इतकी आहे. या म्यूझियमची जगातिक नोंद व्हावी अशी ऐतनची इच्छा आहे.  

बातम्या आणखी आहेत...