आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचा गाझापट्टीवर 4 वर्षांतील सर्वात माेठा हल्ला; 11 ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम- इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा युद्धसदृश स्थिती निर्माण झाली असून, २०१४ च्या गाझा युद्धानंतर इस्रायलने पॅलेस्टाइनची कट्टरवादी संघटना हमासवर अातापर्यंतचा सर्वात माेठा हल्ला केला अाहे. त्यात हमासच्या ५ कट्टरवाद्यांसह ११ नागरिक ठार झाले. या संघर्षाची सुरुवात साेमवारी हमासने इस्रायलवर एकापाठाेपाठ राॅकेट हल्ले केल्याने झाली. त्यात एक इस्रायली नागरिक ठार, तर अनेक जण जखमी झाले. तसेच एक इमारतही उद्ध्वस्त झाली. हमासने एका बसवरदेखील हल्ला केला. सुदैवाने या बसमध्ये कुणीही नव्हते.

 

याच्या प्रत्युत्तरात इस्रायली हवाई दलाने पॅलेस्टाइनच्या गाझापट्टीवर हल्लाबाेल केला. त्यात गाझास्थित हमास समर्थक अल-अक्सा टीव्ही चॅनलची इमारत पूर्णपणे नष्ट झाली. तथापि, इस्रायलकडून हल्ला हाेण्याची शक्यता पाहून इमारतीमधील सर्व लाेकांना अगाेदरच सुरक्षित स्थळी हलवण्यात अाले हाेते. 

 

पॅलेस्टाइनने २४ तासांत ३७० वर राॅकेट डागले

इस्रायल संरक्षण दलानुसार साेमवारपासून मंगळवारी दुपारपर्यंत गाझाने इस्रायलवर ३७० राॅकेट डागले. त्यापैकी सुमारे १०० राॅकेट दलाने हवेतच नष्ट केले, तर २७० राॅकेट इशकाेल भागात काेसळले. तेथे १३,५०० नागरिक राहतात. 

 

का सुरू झाले हल्ले?  

इस्रायलने गाझापट्टीत राबवली गाेपनीय माेहीम  

एका दिवसापूर्वी इस्रायलने गाझापट्टीत राबवलेल्या एका गाेपनीय मोहिमेत हमासचे ७ कट्टरवादी व इस्रायलच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला हाेता. पॅलेस्टाइनचे म्हणणे अाहे की, इस्रायली सैन्याची एक तुकडी गाझापट्टीत ३ किमी अात अाली हाेती. हमासच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाहने राेखण्याचा प्रयत्न केला असता, इस्रायली सैन्याने हमासच्या स्थानिक कमांडरला ठार केले. त्यामुळेच हमासने इस्रायलवर राॅकेट हल्ले सुरू केले. े बंडखाेरांना मारणे किंवा त्यांचे अपहरण करण्याचा नव्हे, तर सुरक्षा मजबूत करण्याचा उद्देश हाेता, असे इस्रायलने म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...