आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन मिशन : 13 अमेरिकन उपग्रहांसह कार्टोसॅट-3 चे 25 नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण, सैन्य सुरक्षेसाठी होणार उपयोग  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो

चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'चांद्रयान-2' लॉन्च केल्यानंतर आता नवीन मिशनसाठी सज्ज झाला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.28 वाजता अॅडव्हान्स रिमोट सेंसिंग उपग्रह 'कार्टोसॅट-3' लॉन्च करण्याची इस्रोची योजना आहे. अंतराळ एजन्सी सूत्रांनी सांगितले की, इस्रोचे प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 47 हे 'कार्टोसॅट -3' ला अंतराळात 509 किमी अंतरावर कक्षेत पाठवणार आहे. या उपग्रहासोबत अमेरिकेचे 13 छोटे व्यावसायिक उपग्रह पाठवण्यात येणार आहे. माहितीनुसार. या उपग्रहांचा उपयोग हवामानाची माहिती आणि लष्कर सुरक्षेसाठी होणार आहे. 

कार्टोसॅट - 3 चे वजन अंदाजे 1500 किलो आहे. हे तिसर्‍या पिढीतील प्रगत उच्च रिझोल्यूशन अर्थ इमेजिंग उपग्रहांपैकी पहिले आहे. या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत 97.5 अंशांच्या स्थापन करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...