आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ISRO Chandrayaan 2 Vikram Lander Updates; Vikram Lander Had Hard Landing Within 500 Meters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून 500 मीटर उंचीवर असताना हार्ड लँडिंग केली, संसदेत सरकारचे स्पष्टीकरण  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी 2.1 किमी उंचीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता

नवी दिल्ली- सरकारने बुधवारी संसदेत सांगितले की, चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरची चंद्रावर हार्ड लँडिंग यामुळे झाली, कारण ठरलेल्या पॅरामीटरच्या हिशोबाने त्याचा वेग कमी झाला नाही. चंद्रापासून अंदाजे 500 मीटर उंचीवर असताना विक्रमने हार्ड लँडिंग केली. 7 सप्टेंबरला विक्रमला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायची होती, यात अपयश आले. त्यानंतर विक्रम लँडरचा आतापर्यंत पत्ता लागला नाहीये.लोकसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, "लँडिंग करण्याच्या पहिल्या टप्प्यात विक्रम चंद्रापासून 30 किमी पासून 7.4 किमी उंचीवर येईपर्यंत सर्वकाही सामान्य होतं. या दरम्यान विक्रमचा वेग 1683 मीटर प्रति सेकंदापासून कमी होऊन 146 मीटर प्रति सेकंड झाला." सिंह यांच्याकडे अंतराळ विभागाचा कामकाज आहे.

दुसऱ्या टप्प्यात वेग वाढला
 
सिंह पुढे म्हणाले, "दुसऱ्या टप्प्यात विक्रमचा वेग ठरलेल्या वेगापेक्षा खूप जास्त होता. पण, तरीदेखील चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होईल अशी आशा होती. पण असे झाले नाही आणि चंद्रापासून 500 मीटर उंचीवर असताना विक्रम लँडरची हार्ड लँडिंग झाली आणि विक्रमशी संपर्क तुटला." 

बातम्या आणखी आहेत...