आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान 2 च्या अपयशानंतर इस्त्रो प्रमुखांना अश्रु अनावर; पंतप्रधानांनी गळाभेट देऊन केले सांत्वन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - पंतप्रधान नरेंदी यांनी शनिवारी सकाळी इस्त्रो सेंटरमध्ये पोहोचून शास्त्रज्ञांची भेट घेतली. या भेटीनंतर मोदी मुख्यालयातून बाहेर पडत असताना इस्त्रो प्रमुख सिवन यांना अश्रु अनावर झाले. सिवन यांची अवस्था पाहताच मोदींनी गळाभेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

यानाचा संपर्क तुटला आहे. आकडेवारीचे विश्लेषण झाल्यानंतरच पुढील माहिती देता येऊ शकेल - इस्त्रो प्रमुख 
भारत अंतराळात इतिहास घडवणार इतक्यात... चंद्रापासून अवघ्या २.१ किमी अंतरावर चांद्रयानाचा इस्रोशी संपर्क तुटला. तेव्हा चांद्रयान नियोजित वेळेनुसार १ मिनिट ९ सेकंदांनंतर चंद्रावर उतरणार होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे चांद्रयान-२चे लँडर (विक्रम) शुक्रवार-शनिवारी रात्री १.५३ वाजता चंद्रावर उतरणार होते. रात्री सुमारे अडीच वाजता इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले, की ‘यानाचा संपर्क तुटला आहे. आकडेवारीचे विश्लेषण झाल्यानंतरच पुढील माहिती देता येऊ शकेल.’

मी तुमच्यासोबत कायम आहे. धैर्याने वाटचाल करा -  पंतप्रधान 
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित होते. इस्रोच्या शास्त्रज्ञांना ते म्हणाले, ‘जीवनात चढ-उतार येतच असतात. तरी हे काही साधे यश नाही. देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या या मेहनतीने खूप काही शिकवले आहे. उज्ज्वल भविष्याची आशा करू या. प्रत्येक अपयशातून आपण काही तरी शिकत आहोत. मी तुमच्यासोबत कायम आहे. धैर्याने वाटचाल करा. तुमच्या पुरुषार्थावर देश पुन्हा आनंदोत्सव साजरा करेल.’ ही मोहीम यशस्वी ठरली असती तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला असता. यापूर्वी चीन, अमेरिका आणि रशिया हे देश चंद्रावर उतरले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...