आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्टोसॅट-3 सह अमेरिकेच्या 13 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण, इस्रो पुढील 4 महिन्यात 13 मिशन लाँच करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीहरिकोटा - तिसऱ्या पिढीतील प्रगत भू-सर्वेक्षण कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे इस्रोने आज सकाळी प्रक्षेपण केले. हे इस्रो या वर्षातील पाचवे मिशन आहे. कार्टोसॅट-3 सह अमेरिकेचे 13 नॅनो कमर्शिअल उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले. या सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण पीएसएलव्ही सी 47 रॉकेटने करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रो प्रमुख के सिव्हन यांनी उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सांगिलते की. "मला हे सांगताना आनंद होत आहे की पीएसएलव्ही सी 47 ने कार्टोसॅट-3 सह 13 उपग्रहांना यशस्वीपणे त्यांच्या कक्षेत पोहोचवले आहे. आपच्यासमोर 6 मार्चपर्यंत 13 मिशन पूर्ण करण्याचे ध्येय आहे. यामध्ये 6 मोठे व्हीकल मिशन आणि 7 सॅटेलाईट मिशन आहेत."