श्रीहरिकोटा / इस्रोने पीएसएलव्ही-सी 48 रडार इमेजिंग अर्थ ऑब्झर्व्हरसह 10 उपग्रहांचे केले प्रक्षेपण!

इस्रायल, जपान, इटलीच्या प्रत्येकी एक, अमेरिकेच्या सहा उपग्रहांचा समावेश

प्रतिनिधी

Dec 12,2019 10:01:00 AM IST

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) रडार इमेजिंग अर्थ ऑब्झर्व्हेशन उपग्रह (रिसॅट-२ बीआर-१) सह १० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या सर्व उपग्रहांचे बुधवारी श्रीहरिकोटा येथील सतीष धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-४८ रॉकेटने रवाना करण्यात आले.


रिसॅट-२ बीआर-१ चे वजन ६२८ किलो ग्रॅम आहे. इस्रोचे प्रमुख सिवन म्हणाले, पीएसएलव्हीचे हे ५० वे उड्डाण आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण खूप महत्त्वाचे आहे. श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपवणारे हे ७५ वे रॉकेट ठरले आहे. कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते तयार करण्यात आले आहे. या रॉकेटमध्ये इस्रायल, इटली, जपानचे प्रत्येकी एक व अमेरिकेच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसह झालेल्या व्यावसायिक करारा अंतर्गत ही मोहिम राबवण्यात आली आहे. रिसॅट-२ बीआर-१ मोहिम पाच वर्षांची आहे. रिसॅट-२ बीआर-१ पूर्वी २२ मे रोजी रिसॅट-२ बीचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. रिसॅट-२ बीआर-१ शिवाय पीएसएलव्ही ९ उपग्रहांना सोबत अंतराळात घेऊन जात आहे. त्यापैकी एक उपग्रह इस्रायलचाही आहे. इस्रायलच्या हर्जलिया सायन्स सेंटर व शार हनेगेव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळून तयार केले आहे. त्याचे वजन केवळ २.३ किलोचे आहे. हा शैक्षणिक उद्देशातून पाठवलेला उपग्रह असून त्यावर लावलेला कॅमेरा अर्थ इमेजिंगसाठी उपयोगात आणला .

X
COMMENT