आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोची चंद्राच्या स्वारीनंतर आता सूर्यावर नजर; 2020 च्या मध्यापर्यंत आदित्य-एल1 लॉन्च होणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चंद्रानंतर इस्रोची नजर आता सूर्यावर आहे. आदित्य-एल1 असे या मोहिमेचे नाव असणार आहे. सोमवारी वृत्तसंस्थांनी इस्रोच्या हवाल्याने सांगितले की, 2020 च्या मध्यापर्यंत हे मिशन लॉन्च करण्याच योजना आहे. सूर्याचा कोरोना त्याच्या पृष्ठभागापासून वर असूनही त्याचे तापमान पृष्ठभागापेक्षा 300 पट अधिक का आहे याचा शोध घेणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.  

इस्रोने आपल्या वेबसाइटवर या मोहिमेसंबंधीची माहिती दिली आहे. सूर्याच्या या बाहेरील आवरणाला तेजोमंडल म्हणतात. हे तेजोमंडल हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.

 

आदित्य-एल1 तेजोमंडलाचे विश्लेषण करणार 
इस्रोचे के.सिवन यांनी सांगितले की, आदित्य-एल1 पृथ्वीपासून 1.5 मिलियन किलोमीटर दूर स्थित असेल. तेथून ते सूर्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. सूर्याचे बाहेरील आवरण तेजोमंडलचे ते विश्लेषण करणार आहे. या तेजोमंडलचा वातावरण बदलावर परिणाम होत असतो. 

 

 

आदित्य-एल1 अनेक अभ्यास करू शकतो
रिपोर्टनुसार, आदित्य-एल1 सूर्याच्या फोटोस्फेअर, क्रोमोस्फेअर आणि तेजोमंडलचा अभ्यास करू शकतो. तसेच सूर्यातून निघणाऱ्या घातक विस्फोटक कणांचा अभ्यास करण्यात येईल. इस्रोनुसार हे कण पृथ्वीच्या खालील कक्षेत कोणत्याही कामाचे नाहीत. या कणांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापासून बाहेर ठेवणे गरजेचे आहे.