आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी अभियंत्याची गोळी झाडून आत्महत्या; आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - बाजार समिती व पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या आयटी अभियंता असलेल्या राहुल (२७) या मुलाने बुधवारी रात्री आपल्या खोलीत डबल बोअर बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पाच महिन्यांपूर्वीच राहुलचा विवाह झाला होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने खोलीत तो एकटाच होता. त्याच्यामागे आई, वडील, भाऊ, भावजय, तीन बहिणी असा परिवार आहे. राहुल अत्यंत मितभाषी होता. मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. मोबाइलवरच तो सतत व्यग्र असे, अशी माहिती मिळाली.


टाकळीभान येथे नानासाहेब पवार यांचे बसस्थानक परिसरात “मातोश्री” हे निवासस्थान आहे. त्यांचा मोठा मुलगा युवक काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष असून शेती करतो, तर दुसरा मुलगा राहुल आयटी अभियंता होता. मात्र, नोकरी न करता व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात तो होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास राहुल तळमजल्यावरील वडिलांचे संपर्क कार्यालय बंद करून आपल्या खोलीत गेला. शेजारच्याच खोलीत त्याचा मोठा भाऊ झोपला होता. खोलीचा दरवाजा बंद करून राहुलने बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यातून आरपार जाऊन समोरच्या भिंतीलगतच्या कपाटाच्या काचेवर आदळली. त्यामुळे काचेला तडे गेले. यात राहुलचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...