आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF सोबत जेवून फिरण्यासाठी बाहेर निघाली GF; वाटेत 4 युवकांनी अडवले, प्रियकाराला बांधून केला गँगरेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद - हरियाणातील एका तरुणीवर 4 जणांनी मंगळवारी गँगरेप केला. ती आपल्या प्रियकरासोबत जेवण झाल्यानंतर वॉकसाठी निघाली होती. त्याचवेळी 4 युवकांनी तिचा रस्ता अडवला. यानंतर तिच्या प्रिकराला वेठीस धरून त्याच्या डोळ्यांसमोर आळी-पाळीने सर्वांना बलात्कार केला. त्याच रात्री 12 च्या सुमारास तरुणी त्या नराधमांच्या तावडीतून सुटली. तिने थेट पोलिस स्टेशन गाठून आपबिती मांडली. यानंतर पोलिसांनी गँगरेपचा एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी स्वतः घटनास्थळाचा तपास केला. तसेच आरोपींना पकडण्यासाठी विशेष टीम स्थापित केली. 


रात्री 9 वाजता जेवल्यानंतर वॉकवर निघाले होते कपल...
आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मंगळवारी रात्री आपल्या प्रियकरासोबत शहारातील एका हॉटेलात रात्री 9 वाजता डिनर करून वॉकवर निघाली होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या 4 जणांनी त्यांना अडवले. प्रियकाराने विरोध केला तेव्हा त्याला देखील मारहाण केली. यानंतर नराधमांनी युवकाला बांधले आणि त्याच्यासमोरच तरुणीवर गँगरेप केला. सुरुवातीला ती पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली तेव्हा पोलिसांनी तिची तक्रार घेण्यास नकार दिला. तसेच वारंवार तिला महिला पोलिस स्टेशनमध्ये जाऊनच तक्रार देण्यासाठी सांगत होते. यानंतर तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने पोलिस आयुक्तांनी स्वतः दखल घेत विशेष पथक नेमले. सोबतच, आरोपींचे स्केच तयार करण्यात आले असून त्यांना लवकरच पकडले जाईल असे आश्वस्त केले.

बातम्या आणखी आहेत...