आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is A Disorder,video Of A Mental Patient Who Had Safetypins And Other Metals In Stomach In Ahmedabad

या महिलेने पोटात बनवून ठेवला होता ज्वेलरी बॉक्स, सेफ्टी पिनपासून ब्रेसलेट-मंगळसूत्र, बांगड्या असे तब्बल 1.5 किलो सामान काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद (गुजरात) - 45 वर्षीय संगीताला साजशृंगाराच्या ज्या वस्तू मिळायच्या, त्या गिळून थेट पोटात टाकायची. असे खूप दिवसांपासून सुरू होते. मग पोटदुखी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी में दर्द शुरू हुआ, तब डॉक्टरों ने चेकअप केले. तिचा एक्सरे काढण्यात आला, तेव्हा डॉक्टरही अवाक झाले. महिलेने आपल्या पोटाला जणू ज्वेलरीचा बॉक्सच बनवला होता. शेवटी सरकारी रुग्णालयात ऑपरेशन करून तिच्या पोटातून तब्बल 1.5 किलो वस्तू काढण्यात आल्या. वास्तविक, संगीताला मानसिक आजार आहे. तिला याची कल्पना नव्हती की, या वस्तू खाऊन ती मोठा धोका पत्करत आहे. संगीताच्या पोटातून लोखंडी खिळे, सेफ्टी पिन, हेअर पिन, मंगळसूत्र, बांगळ्या इत्यादी वस्तू आढळल्या.

 

- संगीता स्वत:ला शिर्डी (महाराष्ट्र) ची रहिवासी सांगते. ती अहमदाबादेत फिरायची आली होती. कोर्टाच्या आदेशावरून तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. 31 ऑक्टोबर रोजी पोटदुखीच्या तक्रारीवरून तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉस्पिटलच्या जनरल सर्जरी डिपार्टमेंटचे सीनियर डॉक्टर नितीन परमार म्हणाले, 'महिलेचे पोट एखाद्या दगडाप्रमाणे टणक झाले होते. एका सेफ्टी पिनने तर तिच्या पोटाच्या भिंतीलाही पंक्चर केले होते. तिचा जीव वाचवण्यासाठी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यावा लागला.'


- हे ऑपरेशन अडीच तास चालले. डॉ. परमार याला एक रेअर डिसऑर्डर मानतात. अशा आजाराने ग्रस्त रुग्ण टोकदार वस्तू गिळतात. अशी केस वर्षातून एखादीच समोर येते.


- मेंटल हॉस्पिटलचे मनोवैज्ञानिक अर्पण नायक म्हणाले, 'शिर्डीमध्ये तिचा भाऊ राहतो. पण आता त्याला संगीताला आपल्यासोबत ठेवायचे नाही. खरेतर, ती तीन वेळा घरातून पळून गेलेली आहे.' 

 

बातम्या आणखी आहेत...