आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is Not Acceptable To Impose Any Language In Any Southern State Including Tamil Nadu Rajinikanth

तामिळनाडूसह कोणत्याही दाक्षिणात्य राज्यात कोणतीही भाषा लादणे मान्य नाही - रजनीकांत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदीला राष्ट्रीय भाषा बनवण्याचे आवाहन केल्यानंतर हिंदी भाषेचा वाद वाढत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने बुधवारी सांगितले की, तामिळनाडूच नाही तर दक्षिणेतील कोणत्याही राज्यात हिंदी किंवा इतर भाषा बळजबरीने लादू नये. केवळ भारतच नाही, तर कोणत्याही देशाची एकच भाषा असणे हे ऐक्य आणि प्रगतीसाठी चांगली आहे. मात्र आपल्या देशात कोणतीही भाषा सक्तीने लागू केली जाऊ शकत नाही.

यापूर्वी अभिनेता कमल हसनने हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याचा विरोध केला होता. कोणताही शाह, सम्राट किंवा सुलतान अचानकपणे असे करु शकत नाही. दरम्यान भाषेबाबत आणखी एक मोठे आंदोलन होईल. हे आंदोलन तमिळनाडूच्या जल्लीकट्टू विरोध प्रदर्शनापेक्षाही मोठे असेल. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो. पण तमिळ ही नेहमीच आमची मातृभाषा राहील. 

कर्नाटक आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांतून विरोध
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 14 सप्टेंबर रोजी म्हटले होते की, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. पण एक अशी भाषा असावी ज्यामुळे जगभरात देशाच्या अस्मितेची ओळख देईल आणि हिंदी भाषेत हे सर्व वैशिष्टये आहेत. शाहांच्या या विधानावर केरळ, तमिळनाडू. कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या नेत्यांनी सुरुवातीलाच विरोध दर्शवला आहे.