आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना शिवसेनेची सत्ता स्थापनेची गडबंड सुरू आहे. पण, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. सत्ता स्थापन सध्याच शक्य नाही त्याला वेळ लागेल, असे पवारांनी नागपूरात अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगिते. त्याचा एक व्हिडीओ आता व्हायरल झालाय. पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या येत्या 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिन शपथविधी घेण्यावर पाणी फिरू शकते.
राज्याला स्थिर सरकार हवंय
महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची समन्वय समितीच्या पहल्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, राज्याचा मुख्यमंत्री आपले 5 वर्ष पूर्ण करेल. आम्ही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना उद्या दुपारी भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, "सर्व पक्षांना स्थिर सरकार हवं आहे, ज्यामुळे राज्याच्या विकासात कोणतीही बाधा येऊ नये. मध्यवधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाहीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरका बनेल आणि 5 वर्ष कार्यभार संभाळेल." काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आघाडी सरकार 6 महिनेदेखील टिकू शकणार नाही. याबाबत विचारल्यावर शरद पवारांनी फडणवीसांवर टोला लगावला. पवार म्हणाले की, "मला माहित नव्हतं फडणवीस जोतिषी आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.