आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • It Is Not Right To Say Now On The Decision Of The FIR On The Bank Directors; Ajit Pawar's Reaction To State Co operative Bank Scam

बँक संचालकांवर एफआयआर दाखल निर्णयावर आताच बोलणे योग्य नाही; राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने तत्कालीन संचालक मंडळावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्याप या याबाबतचे निकालपत्र हाती पडलेले नाही. त्यामुळे या विषयावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी(दि.२२) येथील पत्रकार परिषदेत दिली. 

शिखर बँकेवर संचालक मंडळात असताना आपण उपमुख्यमंत्री होतो. त्यामुळे या संचालक मंडळाच्या जेमतेम एखाद दुसऱ्या बैठकीस उपस्थित होतो. त्यामुळे नेमके प्रकरण काय आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. या संचालक मंडळात विविध पक्षाची ५५ नेतेमंडळी होती. वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असे  पवार यांनी स्पष्ट केले. पक्षातून बाहेर पडणाऱ्यांबाबत  ते म्हणाले, आऊटगोईंग असतानाच सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींचा इनकमिंगसाठी निरोप असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 
 

सत्ताधाऱ्यांना नोटिसा बजावल्या नाहीत
राज्यातील एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखानदारांना सहकार खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. परंतु ते सर्वांच्या बाबतीत झालेले नाही. सरकारमधील साखर कारखानदार मंडळींनीच एफआरपीची रक्कम दिलेली नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देखील मदत दिलेली नसताना त्यांना मात्र नोटिसा  दिल्या नाहीत. 
 

पूरस्थितीला दोन्ही मुख्यमंत्री जबाबदार
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीला कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. आलमट्टतून वेळीच पाणी सोडले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. पुराचे गांभीर्यच लक्षात घेतले गेले नाही. उलट पोरकटपणा करीत भीक मागून मदत मागण्याचे काम सत्ताधारींनी केले, असा आरोपही  पवारांनी केला. 
 
 

बातम्या आणखी आहेत...